Thursday, 31 March 2016

प्रेमाची परिभाषा

दिवसभर वाजणारी लिफ्ट 
साडे आठनंतर 
थांबताना जरासा वेगळा आवाज करते

सारखी करकरणारी दारावरची बेल 
फक्त त्याचवेळी 
ओळखीची हाक मारते

मध्यरात्री हक्कानी ओढुन घेतलेल पांघरुण 
अजिबात कुरकुरता
व्यवस्थित पांघरल जात

तेव्हा समजाव...
घट्ट विणीत गुंफलय...प्रेमाच नात


विचारताच 
काय हव - नको ते कळत

सकाळी टॉवेल, रुमालापासुन 
रात्री औषधाच्या गोळीपर्यंत 
सगळ आपोआप  मिळत

राग
शब्दातुन, कृतीतुन जाणवण तर राहिलच 
तो आला कुठुन आणि गेला कधी 
हे जेव्हा...त्यालाहि कळत नाहि

तेव्हा समजाव...
या नात्याला नावाच्या बंधनाची गरजच नाहि 


जेव्हा रणरणीत उन्हातही सोबत बनते सावली... 

जेव्हा रणरणीत उन्हातही सोबत बनते सावली 

तेव्हा समजाव...
"
प्रेमाला...त्याची परिभाषा...'याच' नात्यान समजावली"

...भावना

Monday, 21 March 2016

जागतिक काव्य दिनानिमित्त कविता म्हणाली...

आज माझा दिवस आहे 
अर्थात हे लक्षात ठेवाव अशी कुणावरच नाहि सक्ती

पण माफ करा जर आज बोचली तुम्हाला 
तुमचीच परवानगी घेउन केलेली स्पष्टोक्ती 


कदाचित औपचारिक वाटेल 
पण आधी ओळख करुन देते

द्य माझा मोठा भाउ 
गीत धाकटी बहिण 
अनेकदा त्यांच्या बरोबर 
बहुतेक वेळा बोलावण नसतानाच म्हणा हव तर 
मी तुमच्या घरी येते 


मधल्या भावंडाच दुक्ख 
तस लपवुन लपणार आहे थोडच

दादाला मोठा मान 
धाकटीचे भारी लाड 
पण माझ्यात मात्र
डोळे मिटुनहि बघणार्याला 
दिसते फक्त खोडच 


धाकटी खरतर खूप अल्लड 
आहे अजुन अजाण आणि साधी

वागण्या बोलण्यातल स्वातंत्र्य मिळतय खर 
पण कळतहि नाहि तिला मर्यादा ओलांडली कधी 


दादाच मित्र -मंडळ मोठ्ठ 
त्यामुळे मला तसा नसतोच त्यांच्यात वाव

फक्त तोंडी लावायला लोणच्याची फोड घ्यावी 
तितकच महत्व मला देउन 
ते पोटभर जेवतात चवीनी 
आणि उगिचच आपला मला मान दिल्याचा आव 


घरचच इतक सांगितल 
आता तुमची तक्रार करु तरी कधी

एवढच सांगते लक्ष असुद्या 
वेळातवेळ काढुन कधीतरी दखल तरी घ्या साधी
...भावना 

अर्पण…


फुल समोर ठेवल 
आज एक निमित्त फक्त 
सांगायची दाखवायची गरज नसते 
तरी भाबडेपणा होतो व्यक्त
कधी धोधो कोसळणार 
कधी अलगद शिंतडणार 
कुठेतरी झिरपणार 
दिलस तू बरच काहि
आज तुझा दिन साजरा करताना 
जे उमलल जे फुलल 
ते तुझ्याच बागेतल 
खरतर या ओंजळीला अर्पणाचाहि अधिकार नाहि.

....भावना 

अपूर्ण…

कित्येक अश्रू  अजाण
कित्येक अबोल
कित्येक सुकलेले 

हे पाय धावत जाणार कुठे 
हे हात एकटे 
हे खांदे वाकलेले

आठवणींचे गु च्छ होते 
आता ओझ झालय 
तरी तेच सार पेलवतय...हे पाहुन मन हेलावतय

खूप मागायच राहिलय 
खूप थिजुन गेल एकाच क्षणात 
अपूर्णत्व निराशेपुढे नीर गाळुन आशेला बोलावतय
...भावना