गणपती बाप्पा घरी आले
आनंदाने घर भरले
......................
गंमतजंमत येणाऱ
लाडु मोदक मिळणार
सुंदर रंगीत मखर दिसे
सगळे डोळे खिळणार
बघा ताईची रांगोळी
तोरण चमचम करणार
उंदिरमामा आज हसे
मान तयाला असणार
लक्ख हासुनी समई बघे
दादा बक्षीस घेणार
नेसुन बाबा सोवळे
मी हि आरती म्हणणार
ताल धरुनी झांज म्हणे
आई प्रसाद आणणार
...भावना