ती पाटी ते दप्तर तो बाक तो फळा
आठवणीत जपलेली आमची ती शाळा
छोट्या-मोठ्या शिशुचे ते रंगीत तक्ते
बाईंचे आवडते ते बोबडे वक्ते
रांगेत पहिला अमोद, शेवटी
मंदार दरवेळा
आठवणीत जपलेली आमची ती शाळा
तेरेदेसाई, थत्ते
आमच्या बाई
केळकर, भागवत
कुणीच ओरडत नाहि
मुल त्यांची लाडकी, लावला
किती लळा
आठवणीत जपलेली आमची ती शाळा
पहिली ते चौथीला हिशोब तोंडी
तेराच्या पाढ्याला घाबरगुंडी
चिंचेच झाड सांगे कर की ग गोळा!
आठवणीत जपलेली आमची ती शाळा
कुलकर्णी बाईंचा सगळ्यान्ना धाक
आधी सतरंजि मग छोटेसे बाक
वरदाचा कुहु कुहु गातो गोड गळा
आठवणीत जपलेली आमची ती शाळा
चौधरी, जोगळेकर,
काजळे बाई
गवळी गोर्हे पेंडसे कुणीच विसरणार नाही
नवीन वर्ष आनंदला, जुन
चा ढग काळा
आठवणीत जपलेली आमची ती शाळा
लहान नाही आता आपण झालो किती मोठे
वरच्या वर्गात नेहमी असेच वाटे
वर्गात गणिताला मात्र दिसे भोपळा
आठवणीत जपलेली आमची ती शाळा
कित्येक आठवणींच्या फुलांचा गुच्छ
डोळ्यापुढे चित्र तसेच उभे आहे स्वच्छ
आज जसे जमलो सर उद्याही पाळु या का याच वेळा?
आठवणीत जपलेली आमची ती शाळा
....भावना
24जुलै 2016