Sunday, 23 August 2015

आठवणींची गोधडी...


आठवणींची विरली गोधडी
आलो घेऊन तुझ्या घरी

                                               
ते जीर्ण धागे सांधले

हीच किमया तुझी खरी
 

मोरपंख हि नक्षीने
विणलास अजून तू त्यावरी
 

मोहरले ते वस्त्रहि
शरमेल शालू भरजरी
 

कोमेजली जणू ती कळी
हरखून झाली तरतरी


परतून स्वप्ने जागली
अन माया पालवली उरी

 
क्षणार्ध अंतर संपले
चैतन्य भरले चराचरी

 
नकळले कधी बरसल्या
आनंदे ओघळल्या सरी

 
पाठीवर फिरला हात तो
वर, “अस्तु!”, बोलला हरी

 
आठवणींची उब अन हि गोधडी
जपेल मज प्राणापरी

...भावना