Monday, 10 August 2015

कमाल केलीत कलाम!


ऐकू आलं तुमच्याकडे नव्हती काहीच मालमत्ता
हातात असूनही, निरुपयोगीच ठरवलीत तुम्ही सत्ता

जगाच्या उठाठेवीत, आपलं घरही नाही बांधलंत
कमाल केलीत कलाम! सांगा काय तुम्ही साधलंत?

 
चौवीस तास चारशेचौवीस वाहिन्यांवर, तुमचीच होती बातमी
पण आश्चर्य म्हणजे, कधी टीव्हीच नव्हता पहात तुम्ही!

विज्ञानाचे पुरस्कर्ते, तरी ऐशारामाला का हो त्यागलंत?
कमाल केलीत कलाम! सांगा काय तुम्ही साधलंत?

 
अखेरच्या क्षणी हि तुम्ही, कामात होता व्यस्त
शिक्षण, जनजागृती यांची तुमच्यावरच होती का हो भीस्त?

एक दिवस सुट्टी मिळायची, पण नाही का हो म्हटलंत?
कमाल केलीत कलाम! सांगा काय तुम्ही साधलंत?

...भावना