Thursday, 6 August 2015

पूर्तता...


तू वृक्ष खंबीर, होऊनी मी लता
अशी बिलगले, विलग न होणे आता...

 
सुखाच्या सरींनी, इथे चिम्ब न्हावे
घडे अमृताचे, तृषातृप्त व्हावे

 
दिशाहीन दाहीदिशांना मिळावी
इथे शांतता अन इथे पूर्तता

 
तू वृक्ष खंबीर, होऊनी मी लता
अशी बिलगले, विलग न होणे आता...

...भावना