चिखल असेन हि,
पण मी ठसा तुझा जपला
तू पाऊल धुतलेस,
तरी मनी या कमळ-कळा लपला
तू असशील वारू,
ती नाल तुला पेलते
तुझे वेड वेगापुढे,
ती ढाल होऊन झेलते
ती वेडी आयुष्य हे,
शोधते झिजण्यात पुन्हा
तापवणे, वाकवणे,
हे नशीब तिचे,
जरी नाही गुन्हा
भाग्य तिचे घरोघरी,
वेशीला टांगले
लाथाडले तू तिला,
बाकी, घाव घालून पांगले
असणे नुसते तुझे, आता अर्थ हि हा
लोपला
काय मऊ स्पर्श हा, कुठे सांग असा
खुपला?चिखल असेन हि, पण मी ठसा तुझा जपला
तू पाऊल धुतलेस, तरी मनी या कमळ-कळा लपला
...भावना