Wednesday, 19 August 2015

तप्त सत्यनिष्ठेचे बोल...


हे रक्त थंड का?
उर्जेची कवाडं खोल

झरू दे लेखणीतून तुझ्या
तप्त सत्यनिष्ठेचे बोल

 
का रडतो? मुळमुळतो?
विश्वासावर गर्वाला तोल

श्रद्धेवीण डळमळल्या
आयुष्याला शून्य मोल

 
अजून वेळ दवडू नको
नको बुजवू उरलेली ओल

जगाकडे डोळे जरी
अंती-आदि तूच, पृथ्वी गोल

 
शुद्ध मनाच्या भूवर उभा
स्वर्गसुखाचा डामडोल

बुरसटल्या विचारांची
कात मुळातून सोल

 
येता- जाता नको बडवू
उगा देशप्रेमाचा ढोल

सोपवल्या आयुष्याला
पेल, नको ठरवू फोल

 
झरू दे लेखणीतून तुझ्या
तप्त सत्यनिष्ठेचे बोल

...भावना