Tuesday, 27 January 2015

माहेरच्या आठवणी …


जरी मी  अल्ल्याड्ची अन तू पल्याडची लेक 
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक


खारीक, शेंगा, साखर, लाडू
बाहुलीच्या लग्नात एकत्र वाढू

शोभे माझ्या बाहुलीला तुझा बाहुला सुरेख
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक


गाभूळ चिंचा वाटून घेऊ
रंग चित्रे जपून ठेऊ

शाळेतल्या त्या वहीत माझ्या, तुझ्या-मैत्रीचा लेख
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक


गप्पांच्या रात्री , चांदण्यांची छत्री
घट्ट करती आपली हि मैत्री 

सुरात मिसळले हे सूर, कधी भांडणं अनेक 
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक


सरले माहेर, उरले सासर
हाक मारती गाईला वासरं

माझ्या जुन्या गोष्टीत फक्त तुझाच उल्लेख
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक                      

भावना