काल माझ्या स्वप्नात एक
बाळ आलं
हसून...'मला जवळ
घे ना' म्हणालं...
मी इतका वाईट
असेन का गं
कि चांगलं काहीच करणार
नाही ?
मग इतकी का
घाबरतेस मला
!
म्हणू ना मी
तुलाच 'आई'?
दमलो जर कधी
उचलून घेशील ना मला
?
तुला इतकं कठीण
का वाटतंय ?
मी तर एवढाच
हट्ट केला !
मला एक छोटीशी
बहिण
नाहीतर असेल ना
गं भाऊ ?
बापरे रागाऊ नकोस !
आम्ही सगळं वाटून
घेऊ !!
खूप मोठ्ठा होईन
तुझ्या काळजीच्या डोंगरा पेक्षा
पण तू हसायला
शिक माझ्या कडून
माझी तेवढीच आहे अपेक्षा
!!
…..भावना