कितीही वेगळे असलो तरी, माणसच
आहोत ना आपण
!
मग का विसरता
येत नाही आपल्याला,
आपलंच ‘मी’पण?आपसूक हसू उमटवते, एखादी छोटीशी गोष्ट
का असतो 'मी', तरीही एवढा शिष्ट ?
रंग रंगाहून वेगळा, बनते
रंगसंगती
मग 'मी' का
उभा करतो, त्यामध्ये
भिंती?फक्त एक माध्यम आहे पैसा, व्यवहार व्हावा सुरळीत
पण वैर निर्माण करतो, नसेल जेवढं भोपळा आणि विळीत
"I " इंग्रजीत आहे कॅपिटल, मराठीत आहे दीर्घ "मी"
ह्रस्व असणं मान्य करेल, तेंव्हाच ठरेल मोठा नेहेमी!!
…भावना