सुत्रधार : आज
कालची शिक्षण पद्ध्ती, ती
विकणार्या उत्साही शाळा, क्लासेस
आणि विकत घेणारे अती उत्साही पालक....पालक
हि पूर्वी भाजी होती हो ...तेच
बर होत नाही!
चला तर मग खाउन बघुया आजचा ' पालक
- रोल' प्ले
***
(
आई , बाबा,
भाउ प्रवेश करताना. आईच्या
हातात तान्ह बाळ, खोलीत
शिक्षिका कामात व्यस्त )
आई :
(हातातल्या बाळाला उद्देशुन) चला
चला शाळेत ॲड्मिशन घ्यायची ना आपण
शिक्षिका : बोला,
कितवीच्या ॲड्मिशनसाठी आलात?
आई :
मायक्रो प्ले स्कूल
शिक्षिका : ह..एज क्रायटेरिया चेक केलात?
बाबा : हो, मिनीमम या सोमवारी 9वाजुन
31मिनीटान्नी पहिला आठवडा संपून दुसरा लागायला हवा.
शिक्षिका : तुम्ही बसताय का त्यात?
आई
: अगदी शंकाच नाही. 9वाजुन
30मिनीट आणि 7 सेकंदानीच
दुसरा आठवडा सुरु होतोय.
शिक्षिका : गुड! ... मुलगा आहे की मुलगी?
बाबा
: मुलगी
आई
: अरे, अस
काय करतोस, मुलगा.
याच्यावेळी मुलीची हौस पूर्ण झाली नाही...म्हणुन
निदान यावेळी तरी... म्हणुन
हा फ्रॉक घातला आहे.
बाबा
: अर्धा लाल आणि अर्धा पिवळा
शिक्षिका : अस का?
भाउ
: रेड मॉम चा फेव ॲंड येल्लो डॅड्चा. ॲंड
धिस मिनिऑन इज माय चॉइस.
शिक्षिका : हे कोण?
भाउ
: ब्रो, मोठा
भाउ
शिक्षिका : इतक अंतर?
आई
: याचा प्रोग्रेस...स्कॉलर्शिप,
सायंस- मॅथ्स
ऑलिंपियाड, यंग
सायंटिस्ट, आय
आय टी इंट्रंस...
बाबा
: सगळ्या..अगदी
सगळ्याचा विचार करुन बरोबर वेळ...
शिक्षिका : ओके ओके...आय
आय टी ...12th नंतर!
भाउ
: या...माय
कझिन स्टर्टेड प्रिपरेशंस इन 8th...तो
सिलेक्ट झाला नाही.
बाबा
: म्हणुन याला आम्ही 3rd मधेच
कोचिंग सुरु केल
आई
: हो...आणि
एक (भाउ)
इंजिनियर म्हणजे दुसरा (बाळ)
डॉक्टर हवा...पुढ्च्या
आठवड्यातच याच्या (बाळाच्या)
नीट च्या तयारिला सुरुवात.
फक्त हा तोपर्यंत नीट वळायला लागु दे म्हणजे झाल.
शिक्षिका : ते का?
बाबा
: तोच तर कोचिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे.
भाउ
: टेक्निक टु सॉल्व्ह ऑब्जेक्टीव्ह क्वेश्चन्स
आई
: उजवीकडे वळला तर येस डावीकडे वळला तर नो. सध्या
इतकच कव्हर होईल म्हणाले. 4चॉइस
एम-सी-क्यु रांगायला
लागल्यावर.(बाळाला
उद्देशुन) डॉक्टर
व्हायचय ना आपल्याला..
शिक्षिका
: अरे ..यानी
तर रडायला सुरुवात केली.
आई
: तिच तर गन्मत आहे. हा
रडला तर हो आणि हसला तर नाही. (बाळाला
उद्देशुन )असच
शिकलोय ना रे आपण.?..बघा
रडला.
शिक्षिका
: हो ..पण
या वयात रडणच जास्त असणार
बाबा
: म्हणुनच तर...त्याला
हो च जास्त वेळ म्हणावस वाटेल ना...म्हणुन
ही सोय
भाउ
: पॉझिटिव्ह ॲटिट्युड
बाबा
: याची सायन्स स्ट्रीम, म्हणजे
आमच अस म्हणण आहे की तुम्ही याला S C I E N C E ही अक्षर ..आणि
त्याच क्रमानी शिकवा.
शिक्षिका
: अहो पण C E दोनदा
येतय की त्यात
बाबा
: हो, म्हणजे
काही गोष्टीन्वर भर जास्त द्यावा लागतो, हे
ही त्याला कळेल.
आई
: आणि एक्स्ट्रा करिक्युलर मधे चेस घ्या ह. चेस
आवडतो त्याला. (बाळाला
उद्देशुन) हो
कि नाही रे. हा
बघा रडला
शिक्षिका
: भुक लागली वाटत त्याला.
बाबा
: छे इतक्यात! दोनच
तर तास झाले. अडिच
तास झाल्याशिवाय नाही. चेस....1
2 अडिच.
शिक्षिका
: ओह .. व्हेरि
गुड...हा
फॉर्म भरा.
बाबा
: दहा लाख...कसले?
शिक्षिका
: आम्ही डोनेशन घेत नाही. पण
ट्युशन फी, ॲक्टिव्हिटि
फी, लॅब
फी मागे यादी दिली आहे की सगळी ....आणि
तुमचा गेल्या दहा वर्षांचा सॅलरी रेकॉर्ड लागेल.
बाबा
: दहा वर्षांचा! कशासाठी?
शिक्षिका
: पुढच्या पंधरा सोळा वर्षांसाठी ॲड्मिशन देणार आहोत. अभ्यास
काय त्याला सहज झेपेल हो पण वाढीव फी तुम्हाला पेलवेल का बघायला नको?! (बाळा
ला उद्देशुन) हो
कि नाही रे?!
भाउ
: हा बघा रडला (आई
बाबा आणि भाउ बाळाकडे आणि आवाक होउन बघतात...शिक्षिका
हसत बघते )
......भावना