Saturday, 6 August 2016

चारोळी....5


संपलेल्या काही गोष्टी
कधीच संपत नसतात
कुठेही आग लागली नसते
तरी तिथे बंब रोज दिसतात
..........................
नको असलेल्या वस्तू
काढुन टाकल्या काल
काही जणान्ना कधीचं विचारलं आहे
तुम्ही कधी जाल
.....................................
सहज भेटल्यासारखे
ते भेटले
कळलच नाही नंतर
मधले अंतर कोणी गाठले
.......................
सरळ जाणारी वाट
मधेच का वळली
तिला आपली मर्यादा
कशी काय कळली
................
तसुभरही हालता
ती जागेवरुनच जराशी हसली
मधे असलेली भिंत
मग अचानक दिसली
..........................
निळ्या रंगाचा होता तो
मी पाहिल जेव्हा दुरुन
आता फक्त एकाच रंगानी
मन राहिलय भरुन
..............................

...भावना