Saturday, 6 August 2016

चारोळी...6

पावसाचा एक थेंब
गालावरुन झाला ओघळ
पुसुन जाताना त्याने
तिचा सोडवला प्रश्न अवघड
...........................................
चिंब भिजुनही
ती तशीच कोरडी राहिली
वाहुन गेलेल्या पाण्यानी
अजुन एक शिळा पाहिली
..............................................
मोकळेपणानी बोलण
जर जिव्हारीच लागणार होत
का शोधत होतो मग आपण
मुळातच नसलेल नात
............................................
तिनी दिलेल्या साडीत
शंभराची नोट दिसली
एक खंभीर साथही हळवी झाली
म्हणुन ती नशीबावर रुसली
........................................
दोघ एकाच वाटेवर
तरिहि दोघ गप्प
शब्दांच्या पलिकडल
इतक त्याच उत्तर सोप्प
......................................
काही सुर टिपले काही शब्द गुंफले
मी गुणगुणत होते काही गाणे
आता पूर्ण भरुन गेलाय गाभा
फक्त ओंकाराने 
 .....................................

ओढलेल्या मुखवट्याची 
सतत काळजी घ्यावी लागत असणार
दमायला होत असेल नाही
विचार करुन-करुन
कधी, केव्हा 
एखाद्या उसवलेल्या विणीतुन सत्य हसणार
.................................................

सोडुन दिलेल्या गोष्टी किती झाल्या
हा हिशोबही धरुन ठेवण कठिण जातय
उलट करुन झाडुन रिकाम केलेल मन
हल्ली वेगवेगळ्या आकाराच्या छिद्राच्या चाळणीच्या रुपात वावरतय


... भावना