काल international yoga day celebration
attend करायचा योग आला.
उपस्थिताना एक योगा मॅट, टी
शर्ट, पाण्याची
एक बाटली देण्यात आली. आम्ही
तसे वेळे आधीच तिथे पोहोचलो तरिही टिशर्ट संपलेले होते. आणि
मॅट मिळते याची आम्हाला कल्पना नव्हती.
हॉल पूर्ण भरला होता. आपापली
आसन पसरुन सगळे विसावले होते.आम्ही खूप वेळ विचार करुन शेवटच्या रांगेत आसना शिवायच आसनस्थ झालो.
परदेशात असलेला आणि इतका मोठा कार्यक्रम त्यामुळे तिथे स्वयंसेवकांची बरिच मोठी फौज होती. शाळेतल्या
मुलांपासुन, आर्ट
ऑफ लिविंग सारख्या इतर कामात सहभाग घेणारे बरेच उत्साही चेहरे स्वयंसेवकांचे बिल्ले लावुन फिरत होते.
आमच्या मागे भिंतीला टेकुन काहि मोजक्या खूर्च्या होत्या त्यावर अगदी
वयस्कर आजी आजोबा बसले होते. आमच्याच
मागच्या तीन खूर्च्यांवर दोन आज्या आणि एक पस्तीस-चाळीशीची बाई बसली होती. त्यांच्या
पायाशी त्यान्नी घेतलेल्या योगा मॅट्सच्या 3-4 वळकट्या
ठेवलेल्या होत्या.
आम्हाला पाण्याची बाटली ही मिळालेली नाही हे बघुन एका शाळकरी स्वयंसेवकानी तत्परतेनी बाटल्या आणुन दिल्या. तेव्हा
त्याच्या लक्षात आल की आम्ही आणि आमच्या सारखे मागे बसलेले बहुतेक आसन न मिळाल्याने तसेच बसले आहेत. त्यानी
लगेच त्या आज्यान्ना आणि त्या बाईला विनंती केली. तिघीन्नीही
आपापल्या परिने कारण सांगुन त्याला आपल्या मॅट्स दिल्या नाहित.
इतक्यात एक आई एका 3-4 वर्षाच्या
मुलाला घाईघाईनी नेताना दिसली. तिनी
स्वत: तो
टीशर्ट घातला होताच पण त्या मुलाला ही एक पायघोळ टीशर्ट गुंडाळला होता. बिचार्याला
त्यात धड चालताहि येत नव्हत.
त्या स्वयंसेवका नंतर अशाच 2-3 लहान-मोठ्यान्नी त्या आज्यांकडे आसन मागण्याचा प्रयत्न केला. नंतर
तिथे योगासनाची प्रात्यक्षिक आणि त्याबरोबर आमची धडपड, झटापट
होणार होती. त्यासाठी
आम्हाला आसन गरजेच होत आणि म्हणुनच ते देण्यात आल होत.
शेवटी एक जरा वयानी आणि कदाचित अधिकारानीही मोठा स्वयंसेवक आला. त्यानी
जरा कडक भाषेत आजीन्ना सांगुन बघितल. त्या
बाईशी तर चक्क तो खडसावुन बोलला तरिहि त्याचा उपयोग झाला नाहि.
तो पर्यंत पहिल्या शाळकरी मुलाने कुठुन तरि काही आसन मिळवुन आम्हाला दिली. आम्ही
तिघात दोन अशी विभागणी करुन आमच्या झटापटीच कारण हे, आम्हाला
योग साधला नाही हे नसुन, आमच
आसन योग्य नाही हे आहे, याची
स्वत:लाच खात्री करुन दिली.
शेवटी गुंतलेले हात पाय सोडवुन धडपणे आम्ही बाहेर आलो खर. खूप
दिवसानी आपल्याला अनेक अवयव आहेत याचा आम्हाला दुसर्या दिवशी जाणवण्या इतका आनंद ही झाला. पण
तेव्हा पासुन ध्यानस्थ बसल्यावर मिटलेल्या डोळ्यापुढे तो टीशर्ट गुंडाळुन
सरपटत चाललेला मुलगा आणि असंख्य मॅट वर वेटोळ करुन बसलेली आजी का
येते आहे कळत नाही.
...भावना