मुठी वळोनी जन्मा आलो
लढण्या सिद्ध तिथेच झालो
आयुष्याच्या पटलावरती सतत युद्ध रंगते
हे जगणे सोपे नाही, नियती हेच तुला
सांगते
सदैव येथे वरती चढणे
अवैध असुनी पाय खेचणे
सरपटणारे जीवन येथे कण्याविना रांगते
हे जगणे सोपे नाही, नियती हेच तुला
सांगते
हाय खाउनी पळू नको तू
आहे त्यावर, न उतू न मातु
दोन घडीचा डाव मांडला...
खेळाडूसम झेल हार, जीतहि उद्या
पांगतेहे जगणे सोपे नाही, नियती हेच तुला सांगते
...भावना