Monday, 21 March 2016

जागतिक काव्य दिनानिमित्त कविता म्हणाली...

आज माझा दिवस आहे 
अर्थात हे लक्षात ठेवाव अशी कुणावरच नाहि सक्ती

पण माफ करा जर आज बोचली तुम्हाला 
तुमचीच परवानगी घेउन केलेली स्पष्टोक्ती 


कदाचित औपचारिक वाटेल 
पण आधी ओळख करुन देते

द्य माझा मोठा भाउ 
गीत धाकटी बहिण 
अनेकदा त्यांच्या बरोबर 
बहुतेक वेळा बोलावण नसतानाच म्हणा हव तर 
मी तुमच्या घरी येते 


मधल्या भावंडाच दुक्ख 
तस लपवुन लपणार आहे थोडच

दादाला मोठा मान 
धाकटीचे भारी लाड 
पण माझ्यात मात्र
डोळे मिटुनहि बघणार्याला 
दिसते फक्त खोडच 


धाकटी खरतर खूप अल्लड 
आहे अजुन अजाण आणि साधी

वागण्या बोलण्यातल स्वातंत्र्य मिळतय खर 
पण कळतहि नाहि तिला मर्यादा ओलांडली कधी 


दादाच मित्र -मंडळ मोठ्ठ 
त्यामुळे मला तसा नसतोच त्यांच्यात वाव

फक्त तोंडी लावायला लोणच्याची फोड घ्यावी 
तितकच महत्व मला देउन 
ते पोटभर जेवतात चवीनी 
आणि उगिचच आपला मला मान दिल्याचा आव 


घरचच इतक सांगितल 
आता तुमची तक्रार करु तरी कधी

एवढच सांगते लक्ष असुद्या 
वेळातवेळ काढुन कधीतरी दखल तरी घ्या साधी
...भावना