Monday, 18 April 2016

मैत्रिण...

पहिलीचा वर्ग 
पहिल्याच दिवशी 
बाकावर बसलेलो एका

शांत तू
नाईलाजास्तव मीहि 
वर्गाला नव्हता धोका


टिना-मीनाची 
बडबड सारखी 
बाईंचा नव्हता त्यान्ना धाक 

त्यांच्या गप्पा 
थांबवण्यासाठी बाईन्नी 
आपलेहि बदलले बाक


तुझ्या आवडी
माझ्या आवडी 
आपण तरिहि एकत्र
 
तुला-मला 
एकच छंद 
दोघीही काढायचो चित्र


कॉलेज एकच 
आपोआपच 
जरि विषय होते वेगळे 

मैत्रिणी तुझ्या 
आणि माझ्या मिळुन 
आपण एकत्रच असायचो सगळे


शाळा संपली 
कॉलेज संपल 
नंतर झाली लग्न 

तू पुण्यात 
आणि मी ठाण्यात 
आपापल्या संसारात मग्न


अशीच अचानक 
फिरता-फिरता 
परत झाली आपली भेट
 
जुने बंध 
पुन्हा जुळले 
मदतीला आल इंटर्नेट


ग्रूपवर तू 
आणि मीहि एकाच 
दोघीन्ना आवड करायची कविता 

जोडी फोडायला 
पुन्हा मात्र 
बाई येउ शकणार नाहित आता

...भावना


#Shirish Latkar


'The Precious'

I am a common man
yet, looking like Tom Cruise 

whenever I feel like
I can wear anybody's shoes


I am a common man
in the driving seat of Exelero

I can fly my own charter
and plan any time for Cairo


I am a common man
who can sleep calm with dreams 

you all who are running
have lost 'The Precious' it seems


Bhavana

घर मी बांधल ग...

माळाच्या उतरणीला 
झर्याच्या जोमानी 

घर मी बांधल  
वेलीन्मधे प्रेमानी


पाखरु फुला कानामधे 
कुजबुजुले रोखानी 

माझे येणे सजविले 
मोठ्या हौसे दोघान्नी


शेजाराला वड उभा 
आधाराला हक्कानी 

खेळायाला त्याच्या दारि 
खुणावले झुल्यानी


उणे पाउल, खडा बोचे 
हलक्याशा रागानी 

लटक्या त्या सोंगालाहि 
हसविले तृणानी


रोज वारा दारापुढे 
'
जरा घे कि दमानी!'

निरोपाचे पत्र आले 
लिहिलेले पानानी


सोबतिला दिसभर 
मोठा भाउ नेमानी 

छोटा सारी रात जागा 
पांघरले ढगान्नी


कुशी तिच्या मऊ माया 
निज तृप्त डोळ्यानी 

उद्या हेच स्वप्न जगु 
निसर्गाच्या संगानी
...भावना


Thursday, 14 April 2016

सोसायचेत अजुन घाव अनेक

डोक्यावरती घेतलाय पदर 
जरी छप्पन गाठीची किनार 

'
विसरता येणार्या' त्याच आठवणी
गावोगावी शेंदुर-टिळा अन हार


मिटल्या डोळ्यात तेवताहेत अंगार
पहारिला कळेल प्रहारातली मेख 

सोसायचेत अजुन घाव अनेक
मी पत्थराची लेक



आभाळ चिरत तिरीप आली
तिला सापडेना कवडसा 

उन्हाच्या आभाळात सावली लोपली 
चटक्याविना माझाच ठसा


उठलाय डोम, दिशा विसरली जात
झळान्नीहि नेसलाय शालु सुरेख 

सोसायचेत अजुन घाव अनेक
मी पत्थराची लेक



मुर्दाड मनावर फुलपाखरु हसल
भाकित आरशालाहि स्वप्नात दिसल 


स्वाभिमानाच्या चुराड्यात
लपलाय सोन्याचा कण एक 

सोसायचेत अजुन घाव अनेक
मी पत्थराची लेक

...भावना 


#Akshay Kumar


Monday, 11 April 2016

जुनी मैत्रिण...

मागे वळुन बघितल
जुनी मैत्रिण दिसली 

मी ओळखल नाहि
ती स्वतहावरच हसली


किती बोलका चेहरा
होती डोळ्यात वेगळीच चमक 

पराजयाशीहि लढण्याची
होती तिच्यात धमक


ताठ उभी होती
प्रचंड आत्मविश्वास 

होता स्वाभिमान जपलेला
लवलेशहि नव्हता दुस्वास


होत तिच्यात अस काहि
जे माझ्यात का नाहि याची वाटली खंत 

ती चट्कन म्हणाली
"
तुला याच रस्त्यानी चालण आहे ना पसंत!"


गोंधळुन जाउन मी विचारल
"
हे तुला कस कळल?"

ती उदास हसुन म्हणाली
"
रस्त्याच्या सुरुवातीलाच होत माझ घर...
तुलाच कळल नाहि तुझ पाउल कधी विरुद्ध दिशेला वळल!!!"
...भावना


चारोळ्या...4

तुझ्या मांडिवर डोक ठेउन
खूप रडायच होत

आता कोरडे झालेत डोळे
अश्रून्नाहि लागत आपल म्हणणार नात

.................


मुठीत असलेल एक नाण धट्ट पकडुन
तो तसाच झोपला

विश्वास कि अविश्वास हे कोड सोडवतच
काळ लोपला

..............


सगळ्यान्ना एकत्र आणण्यासाठी
त्यानी जिवाच केल रान

टाळ्या वाजवुन सगळे परतले
कोणी दोनदा तर कोणी तिनदा म्हणाल छान
...भावना