Monday, 11 April 2016

जुनी मैत्रिण...

मागे वळुन बघितल
जुनी मैत्रिण दिसली 

मी ओळखल नाहि
ती स्वतहावरच हसली


किती बोलका चेहरा
होती डोळ्यात वेगळीच चमक 

पराजयाशीहि लढण्याची
होती तिच्यात धमक


ताठ उभी होती
प्रचंड आत्मविश्वास 

होता स्वाभिमान जपलेला
लवलेशहि नव्हता दुस्वास


होत तिच्यात अस काहि
जे माझ्यात का नाहि याची वाटली खंत 

ती चट्कन म्हणाली
"
तुला याच रस्त्यानी चालण आहे ना पसंत!"


गोंधळुन जाउन मी विचारल
"
हे तुला कस कळल?"

ती उदास हसुन म्हणाली
"
रस्त्याच्या सुरुवातीलाच होत माझ घर...
तुलाच कळल नाहि तुझ पाउल कधी विरुद्ध दिशेला वळल!!!"
...भावना