दुःख वाटायला
गेले
वाटेकरी कोणी
नाही
दाराच्या त्या
फटीपाशी
कान, डोळे सर्वदाहि
दुःख वाटायला
गेले
आप्त मोठे कनवाळू
मोजणीला आले
ध्यानी
मागे झाले तेहि
हळू
दुःख वाटायला
गेले
तोही नुसताच
उभा
कर कटेवर त्याचे
कोणी मार्ग
दाखवावा?
दुःख वाटायला
गेले
होती कारणे अनेक
सुखाचीच उमटावी
माझ्या हातावर
रेख
दुःख वाटायला
गेले
थिटा हात हाती
आला
माझ्या दुःख
करण्याचे
कारण तो पुसे
मला
माझ्या दुःख
करण्याचे
कारण ना दिसे
मला
...भावना