तरीहि त्याने न बुजलेला.
बांधत होता उंच मनोरा, एकग्रतेने गढुन
स्वप्न त्याचे, 'सागर मापु,
त्यावरती
चढुन'
पाठ टेकुन विहिर होती
सोबत, परंतु स्वतंत्र व्यक्ती
सागराचा थांग शोधता, तीहि झाली खोल
हात तिचेहि अथक चालले, न ठरो यत्न फोल
सागराला त्याचे धोरण
कुणी न टिकला ठेउनहि तारण
लाट एकच करुन गेली, सगळी भुई सपाट
तीच उमेद घेउन त्यांनी, घातला पुन्हा तोच
घाट
...भावना