कुठे हरवल्या त्या दिनरात्री
तो तेंव्हाचा निवांत वेळ
कुस बदलली फक्त कधीतरी
नको जराही बदल हवेत
थंडी मध्ये चादर ओढुन तुझी
पहुडलो जरी झाली अवेळ
कुठे हरवल्या त्या दिनरात्री
तो तेंव्हाचा निवांत वेळ
रात्रींवर तर फार जिव्हाळा
सवे पाहिला चांदण सोहळा
वेड पांघरून जरी हळवा झालो
तरी घेतले मला कवेत
कुठे हरवल्या त्या दिन रात्री
तो तेंव्हाचा निवांत वेळ
कुठेही गेलो तेच ठिकाण
शांततेला ऐकु शकलो तिथे जिथे ऊन सावल्यांचा खेळ
कुठे हरवल्या त्या दिन रात्री
तो तेंव्हाचा निवांत वेळ
..भावना