अशा ठिकाणी एक घर
असावं
स्वप्नात आणि
वास्तवात अंतर नसावं
शांतता मनसोक्त
ऐकू यावी
एकाग्रता मनाची
मनातच असावी
चित्रकाराच्या
हातांना उसंत नसावी
कवीला ठायी ठायी
प्रेरणाच दिसावी
गाणं सूर सोबत
घेऊनच जन्मावं
समाधान सतत
गुणगुणत रहावं
दैवत्व
देव्हाऱ्यात बंदिस्त नसावं
अशा ठिकाणी एक घर
असावं
...भावना