ओंजळीतल्या
प्रतिबिंबातच, चंद्र शोधीत
रमले मन की
जोजविले मी, अजाण मानीत
मध बोटाचे चाटत
त्याची, सरे आता रात
खुशीत मी हि
गुंडाळले, ते नाइलाज शांत
मान बाजूला वळे
कधी, कडेकोट बंदोबस्त
बोळा कानामध्ये,
ऐकण्या कोणी नसे आर्त
कशी तेवत राहील,
इथली स्वयंस्फूर्ती ज्योत
जीवन म्हणजे,
जगणे नुसते फुका संभ्रमात
...भावना