दिल्या
क्षणांच्या वैफल्याचे
भार कधी उतरू
नको हिशेब विचारू
आता, नको हिशेब विचारू
कथुनि काय सांगू
तुजला
दिला जन्म येथे
थिजला
थकुनि देह आहे
निजला
वेड कसे
पांघरू
नको हिशेब
विचारू...
एकच मार्गे गेलो
आपण
परी न उरले इथे
ऋषीपण
नाही मंत्र न
धनुष्यबाण
पडझड कशी उभारू
नको हिशेब
विचारू...
वनात पुष्पे
तुझ्या पाऊली
धरी न आता कुणी
साऊलीचार टिपे हि नाही गळाली
दुःख कसे सावरू
नको हिशेब
विचारू...
यत्न होता मी पण
केला
स्वार्थ त्यागला,
भला आपला
नाही जयंती न
पुण्य तिथीला
शून्यच बाकी
धरू
नको हिशेब विचारू
आता नको हिशेब विचारू...
...भावना