Tuesday, 15 September 2015

मला आवडतं तुमचं हे flexible रूप


दरवर्षी घरोघरी घेता पाहुणचार खूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


प्रसन्न चेहरा, मोकळा स्वभाव
इतकी तल्लख बुद्धी, पण गर्वाचा अभाव

येण्यानेच तुमच्या येतो किती हुरूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


किती प्रकारची चित्र, मूर्ती, किती दागिन्यांचे सेट
आमचीच हौस तुम्ही भागवताय, you  are  great !

इतके सोपस्कार, इतके लाड, शोभतं तुम्हालाच अनुरूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


घेर पोटाचा उगाच लपवत नाही तुम्ही कधी
एलिफंट God हे नाव तुम्हाला कुणी बरं दिलं आधी?

स्वागताला तुमच्या असतं, सोहळ्याचं स्वरूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


नावांचाच विषय निघाला, म्हटलं विचारावं आता
असंख्य नावं, तुम्ही हाकेला ओ कशी देता?

'बाप्पा' घरचं वाटतं आणि आपलं जमेल हि खूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


दरवर्षी येण्याचा, तसाच जाण्याचा क्षण येतो
एक आनंद, दुसरा चाहूल दुखाची देतो

यातूनही काहीतरी शिकवू पाहताय ना गुपचूप!
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


...भावना

Thursday, 10 September 2015

चारोळ्या...३


* हसायला, रडायला, बोलायला कुणितरी लागतं
 या चारोळी हि, शिकले आहे कुणाकडुन...

 आणि कुणिच वाचल्या नाहित तर कळेल
 किती फोल आहे म्हणणं, माझं तुमच्या वाचून भागतं


*सारख्या सुचना देउनहि जेव्हा बदल जाणवत नाही
 बदलाच्या अपेक्षेची दिशा बदलू ...

 प्रयत्न सोडले म्हणून
 मन स्वतःला तरी मग हिणवत नाही


* मिणमिणत्या ज्योतीला आपसुक आडोसा दिलास जरी 
 तिचा जीव जगवत होतास

 कि आपल्या कोनाड्यातला उजेड जाईल
 यासाठिची हि धडपड सारी


...भावना

चारोळ्या...२


*वाहिलेल्या प्रत्येक फुलाला
 तुझ्या आवडीचा रंग आहे

 तू बघतो आहेस
 माझा विश्वास अभंग आहे

 

*सत्याची चव बघायला गेले
 गुळ घालून, साखर पेरुनही होती कडू

 पुढे काय वाढून ठेवलेय
 विचारांनी येतंय फक्त रडू

 

*तू म्हटलंस दोन
 कि मी म्हणते चार

 बघ ना एकाच पाढ्यातले अंक
 आपले कित्ती जुळतात विचार!


...भावना

Wednesday, 9 September 2015

डायरी त ली शायरी ......७


*......बदलेमें अगर तुमने दिया है गम ही
    कबूल है खता हमारी होगी...

    तुमने अगर देखके अनदेखा किया
    शायद रोशनीही तब बहुत कम होगी  I

 
*......माँगने आए थे हम
    साथ में ली थी बड़ी सी झोली...

    मोह, माया, अहंकार गया
    जब तुमने ये बंद आँखे खोली   I

 
*......रेत पे लकीरें खींच रहा
    मत समझ उसे कुछ काम नहीं...

    तकदीर की लक़ीरोंसे लड़ रहा है
    शांती के समंदर में भी उसे आराम नहीं  I

...भावना

Madhubala


Wednesday, 2 September 2015

बातमी खोटी आहे हो ती!!!


संवेदनाहीन संवाद
अख्या दिवसातले,

उगाचच....छोट्या-छोट्या गोष्टीतले वाद


शोधावी म्हटलं एखादी शांत खोली
बातमी खोटी आहे हो ती,

मी नाही तुम्हीच आत्महत्या केली


तसं हे इतकं काही चटकन
             ठरवलं नाही बरं!

अनेक वेळा ठोठावलं
         पण...

    तेंव्हा तुमचीच बंद होती दारं

 
दोष देत नाही हं पण...
आधी कधी जाणवलीच नाही ना तुम्हाला

              हि पापणी ओली!
आता तरी जाणवलं का? 

मी नाही तुम्हीच आत्महत्या केली


काय म्हणता!
               बातमीत नाव, पत्ता ओळखीचा वाटला नाही?

असू दे कि, पण...
आपण माणसंच, किती जवळचं नातं,

                     म्हणून आत्ताही कंठ दाटला नाही??

 
हेच तर ते लक्षण आहे,
   ज्याची कधी तुम्हाला जाणीवच नाही झाली

  अहो.........मी नाही तुम्हीच आत्महत्या केली


कालपर्यंत मीही
...याच बातम्यांवर ठेवला होता कि विश्वास!

पण आज हसू आलं,
जेंव्हा...............कंठाशी रेंगाळत होता श्वास 


वाटलं
उद्या कदाचित तुम्हालाच खोलवर धगधग जाणवेल

........बंद डोळे, कान उघडणारा एखादा दिवस उगवेल


इथला पत्ता ठेऊ का?
तुम्हीही जागे व्हाल,

बघा... माझी आशा कधीच नाही मेली
बातमी खोटी आहे हो ती,

....मी नाही तुम्हीच आत्महत्या केली

...भावना