Tuesday, 15 September 2015

मला आवडतं तुमचं हे flexible रूप


दरवर्षी घरोघरी घेता पाहुणचार खूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


प्रसन्न चेहरा, मोकळा स्वभाव
इतकी तल्लख बुद्धी, पण गर्वाचा अभाव

येण्यानेच तुमच्या येतो किती हुरूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


किती प्रकारची चित्र, मूर्ती, किती दागिन्यांचे सेट
आमचीच हौस तुम्ही भागवताय, you  are  great !

इतके सोपस्कार, इतके लाड, शोभतं तुम्हालाच अनुरूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


घेर पोटाचा उगाच लपवत नाही तुम्ही कधी
एलिफंट God हे नाव तुम्हाला कुणी बरं दिलं आधी?

स्वागताला तुमच्या असतं, सोहळ्याचं स्वरूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


नावांचाच विषय निघाला, म्हटलं विचारावं आता
असंख्य नावं, तुम्ही हाकेला ओ कशी देता?

'बाप्पा' घरचं वाटतं आणि आपलं जमेल हि खूप
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


दरवर्षी येण्याचा, तसाच जाण्याचा क्षण येतो
एक आनंद, दुसरा चाहूल दुखाची देतो

यातूनही काहीतरी शिकवू पाहताय ना गुपचूप!
मला आवडतं तुमचं हे flexible रूप


...भावना