*वाहिलेल्या प्रत्येक फुलाला
तुझ्या
आवडीचा रंग आहे
तू
बघतो आहेस
माझा
विश्वास अभंग आहे
*सत्याची चव बघायला गेले
गुळ
घालून, साखर पेरुनही
होती कडू
पुढे
काय वाढून ठेवलेय
विचारांनी येतंय फक्त रडू
*तू म्हटलंस दोन
कि मी
म्हणते चार
बघ ना
एकाच पाढ्यातले अंक
आपले
कित्ती जुळतात विचार!
...भावना