माझी माणसात रहायची हौस, पूर्ण झाली आहे
आज
'whatsapp च्या 50 groups ची membership
मिळवायचीच',
ही
होती मला खाज
शेकडोंनी Good morning thoughts, घेउन
येते आता सकाळ
comments चा पाऊस पडतो, discussion चा topic
असतो
जेव्हा दुष्काळ
'खूप काम अजिबात नाही वेळ', यावर
रंगतात हल्ली गप्पा
'चेहरा आठवत नाही selfie टाक', भेटायचा
त्रास नको उपाय कित्ती सोप्पा
birthday wishes चा पूर येतो, सगळे हक्कानी
मागतात एकमेकाकडे feast
सगळे सर्वनामातच वावरतात मात्र, कारण
update होत नाही कुणाचीच contact list
मनानी सगळेच श्रीमंत, भरभरुन देत
असतात likes
परिस्थिती ही चांगलीच असेल त्यांची,
photo त सोबत दिसतात cars किव्वा महागड्या bikes
सध्या कुणाचाच दिवस, good night म्हटल्याशिवाय
सार्थकी लागत नाही
आणि रात्री data connection off ठेउन,
दुसऱ्यान्चच
कशाला आपलंही भागत नाही
stay connected चा वेताळ प्रत्येक विक्रम खांद्यावर
मिरवतोय
माझी माणसात रहायची हौस पूर्ण झाली की
माझ्यातला माणुस ही या मायाजाळात हरवतोय?
...भावना