Wednesday, 7 October 2015

साधी सोपी विभागणी


नुसतं झाड जरी म्हटलं
तरी त्याच्या आहेत शेकडो जाती

प्रत्येक प्रकारच्या झाडाला आवड वेगळी
मग हवा असो, पाणी असो, नाहितर असो माती

 
रुप त्यांना दिलंस वेगवेगळं
कधी वेगळे रंग, कधी गंध आणि आकार

स्वस्थता मिळाली त्यांना त्यामुळे
त्यांना पाडायला नकोत धर्म, जाती आणि त्यांचे ओढुन ताणुन आणलेले प्रकार

 
प्राणी म्हणा पक्षी म्हणा
आहे जरी त्यांच्यात साम्य ढोबळ

सालस किव्वा हिंस्रवृत्ती सहज जाणवते
विनासायास कळतं, कोण भक्ष आणि कोण श्वापद प्रबळ

 
मग माणसाबाबतच का रे केलास असा भेद?
आज बोलावासा वाटतोय मनातला खेद

दिलेस सहनशील पाय, दिलेस कष्टाळु हात
रंग रुप दिलंस थोडं वेगवेगळं, पण त्यानी ठरत नाही स्वभावाची जात

 
कोण कोल्हा कोण लांडगा, हेच कोड सोडवायला दिलीस का रे हि अक्कल
हळवं मन दिलंस विश्वास ठेवणारं , पण डोळे ओळखुच शकत नाहित घातकी शक्कल


आता ये आणि कर विभागणी साधी सोपी,
हिच एक मागणी

 
निरर्थक होतोय वाद, तू न पाडलेल्या गटबाजीमुळं
रंग-रुप असुदे भिन्न पण नक्की कळुदे कोणतं मन किती काळं

...भावना