तुझ्या मर्जीने तू आलास
वेळ ठिकाण सगळं- सगळं तूच ठरवलंस
किती, कुठे, कुणाला, कसं
द्यावं-मिळावं
सगळं तुझ्याच हिशोबानी घडवलंस
तुझा राग, तुझा लोभ
सगळं झेललं त्यांनी
तरिही
त्यांना अगतिक करुन गेलास
आपल्याच मर्जीने
सोडुन आपलं कार्य
मी शेवटपर्यंत साथ दिली
जळले, वितळले त्यांच्यासाठी
तरीही...
मी यःकश्र्चित मेणबत्ती
...........आणि तू मात्र सूर्य
...भावना