काहि वर्षांपूर्वी...सापडलेला माझा केस जपून
ठेवलेलास प्रेमाने डबीत
आज चरचरतोय तोच आणि सहन होत नाही जराहि तुझ्या
पायाला
'आपल्यात भांडण का झालंय?' ते
आठवतंय ना तुला ?
प्रेम आटलंय, प्रेम संपलंय
वगैरे शब्दांसाठी कादंबऱ्यान्चा नको आधार
साधा, 'मी थोडासा माझा वेळ माझ्यासाठी वापरावा',
इतकाच
आलेला माझ्या मनात विचार
वेळ आहे ना तुझ्याकडे? ...कळतंय
ना काय म्हणायचंय मला
आणि हो 'भांडण का झालंय?'
ते
आठवतंय ना तुला?
काल छान मुड होता... वाटलं एक पेंटिंग करावं
तुलाच देणार होते...महिन्यानी वर्ष संपेल आपलं
सतरावं
रंग, ब्रश काहिच नव्हतं...सगळं आणण्यापासुन
तयारी
चिंगी शाळेतुन येईल...म्हणुन विचारलं, 'येशील
का घरी?'
एक दिवस वेळ दे म्हटलं थोडा…तुझ्या
या हि जबाबदारिला
पटतंय का? आणि 'भांडण
का झालंय?' ते आठवतंय ना तुला?
कंटाळा येतो रे कधी कधी जेव्हा तुमच्या कपाळावर
बघते आठी
खूप धडपड करते आणि तशी रोजच जगते कि मी फक्त
दुसऱ्यान्साठी
'दुसरे' म्हटलं पण परकेपणाचा विचारहि नव्हता
शिवला
फारच काथेकुट करते आहे का?... 'स्वतःचा
विचार केला', म्हणुन माझंच
मन खातंय का मला?
अरे हो पण 'आपल्यात भांडण
का झालंय?' ते आठवतंय ना तुला?
चिंगीची शाळा, अभ्यास, परिक्षा
असो किव्वा असो वाढदिवसाच्या पार्टीची धमाल
तुझ्या टुर्स, मिटिंग्ज तुझी
टेंशन्स असोत किव्वा रोजचं असो डबा,
पाकिट,
पेन
आणि रुमाल
सगळं करते रे आणि आवडतंहि मला
तक्रार ‘ही’ नाहिच
आहे, वाटतं जरा कधी तरि… ‘अप्रिसिएशनंच नाही या कामाला’
असु दे, सोड ते, पण 'भांडण
का झालंय?' ते आठवतंय ना तुला?
लग्नाच्या आधी कधीच अशी जाणीव नव्हती
दादा आणि माझी तीच शाळा आणि तशीच स्वप्न होती
अचानक समोर आलेलं जग… अजुनहि लागतंय
धडपडायला
‘एक धेय दाखवुन दुसऱ्या अपेक्षा पेलवणं’…असं
तरी करावं लागलं नव्हतं ना रे तुझ्या-माझ्या आईला
काय करणार!? पण 'आपल्यात
भांडण का झालंय?' ते आठवतंय ना तुला?
'अरे बापरे हा झोपला वाटतं!'... आज
पहाटे जावं लागलेलं ना कामाला!
‘छोले आवडले का डब्यातले?’… सांगितलंच
नाही मला!
उद्या चिंगीचा पेपर…आठवण केलेली…
पण
बोलेल ना तिला?
आणि हो…आमच्यात भांडण झालेलं... ‘का’
ते
कळलं ना त्याला?
...भावना