Wednesday, 28 January 2015

पुढच्या जन्मी मला


पुढच्या जन्मी मला पाणी व्हायला आवडेल
प्रत्येक  अंगणी रहायला आवडेल
 

डोळ्यात दुक्खात कधीतरी, पण आनंदात नेहमी असायला आवडेल
पुढच्या जन्मी मला पाणी व्हायला आवडेल

प्रत्येक अंगणी रहायला आवडेल


भरभरून बरसायला आवडेल,
खळखळून वहायला आवडेल

तर कधीतरी शांतपणे विचारात बुडायला आवडेल
पुढच्या जन्मी मला पाणी व्हायला आवडेल

प्रत्येक अंगणी रहायला आवडेल


दृष्टीला जो देईल समाधान,  त्या  रंगात मिसळायला आवडेल
तहानेला तृप्तीची, निरनिराळी चव द्यायला आवडेल

पुढच्या जन्मी मला पाणी व्हायला आवडेल
प्रत्येक अंगणी रहायला आवडेल


...भावना

Tuesday, 27 January 2015

सायकल


रात्रीचे साडे अकरा  वाजले होते. सगळे रस्ते सामसूम होते. काही तुरळक जाग असलीच तरी ती हि फार काळ टिकणार नव्हती. अगदी शेवटपर्यंत रेंगाळणाऱ्या गिराहीकालाहि टिकवू पाहणारे मोट्ठे मॉल सुद्धा अकरा पंचेचाळीसला पेंगायला लागणार हे निश्चित होतं. म्हणजे तशी पाटीच दाराबाहेर लावलेली होती.

आम्ही घाई घाईनि मॉल मध्ये  शिरलो.  ती तीन मजली इमारत आम्ही तीन मिनिटात पालथी घातली. नंतर गाडीतून, आम्ही रस्त्यावरची बंद झालेली दुकानं शोधू लागलो. आणि शेवटी एकदा एक दुकान सापडलं.

 दुकानदार दुकानाबाहेर मांडून ठेवलेल्या वस्तू आत आणून ठेऊन, घरी जायच्या तयारीत होता. तरीही आमच्या तिघांचा उत्साह बघून हिरीरीने तो त्याचं नशीब आजमावू लागला. तसा त्याचा फार वेळ गेला नाही कारण पुढच्या दहा मिनिटातच आम्ही, आलो त्याच वेगात निघालो. फक्त आम्हाला सगळ्यांनाच त्याक्षणी हवी असलेली एक गोष्ट घडली होती, ती म्हणजे निघताना आमच्याबरोबर गाडीत एक सायकल होती.

त्या रात्री आमच्या या उत्साहाला फार साक्षीदार नव्हते पण दुसऱ्या दिवशी दिवसभाराचि सगळी कामं उरकून, आम्ही आणि आमची नवीन सायकल, रात्री दहा वाजता त्याच उत्साहात खाली उतरलो हे मात्र  अनेकांनी पाहिलं.

दिवसभर अभ्यासाचं ओझं होतं तरीही आता सायकल शिकायला माझी मुलगी उत्सुक होती.  तिचा तोल जाऊ नये म्हणून तिच्या सायकल मागे तिचे बाबा धावत होते.  खरतर ऑफिसमुळे झालेली दगदग त्यांना आता विश्रांतीची गरज जाणवून देत होती. पण तरीही लेकीला प्रात्यक्षिक दाखवण्याच्या निमित्ताने किव्वा स्वतःची खूप दिवसांची इच्छा म्हणून त्यांनी स्वतःही चार फेऱ्या मारल्या.

त्यावेळी मी, आजूबाजूची सगळी माणसं आपापल्या घरी जाउन सामसूम कधी होईल, याची वाट बघत होते. आपल्यालाही सायकल चालवणं जमेल ना, हा विचार माझ्या मनात येत होता. त्यांनी समोर आणून ठेवलेल्या सायकलमुळे मी विचारातून जागी झाले.  दोघंही आता माझ्याकडे अपेक्षेने बघत होती. सध्या आमच्या दारात गाडी होती पण माझी सायकलही शिकायची राहून गेली होती. दोघांच्या डोळ्यातला विश्वास बघून मी सायकलवर बसून जमिनीवरचा दुसरा पाय पायडलवर ठेवला. आणि जमलं कि, तो मागे आहे हि जाणीव आणि मुलीचा उत्साह या भांडवलावर मी थोड्याच वेळात  सायकलवर पूर्ण ताबा मिळवला.  माझा तोल मी सांभाळू शकले.

ऐवढ होई पर्यंत आजही साडे अकरा वाजून गेले. आमच्या त्या  अचीव्मेंटला आणि आनंदाला आत्ता आमच्या शिवाय आणखी  कोणीच साक्षीदार नव्हता. पण आमचा आनंद मात्र आम्हाला सांगत होता, नकळत  आता खरंच आयुष्यात ब्यालान्स जमू लागला होता. आपल्या कुटुंबासाठी आपण करतो आहे ते आपलं कर्तव्य  आहे कि त्याग या विचारात भरकटलेल्या आमच्या मनावर आम्ही आता ताबा मिळवला होता. आम्हाला हवी असलेली सायकल सापडली होती.

  ...भावना   

माहेरच्या आठवणी …


जरी मी  अल्ल्याड्ची अन तू पल्याडची लेक 
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक


खारीक, शेंगा, साखर, लाडू
बाहुलीच्या लग्नात एकत्र वाढू

शोभे माझ्या बाहुलीला तुझा बाहुला सुरेख
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक


गाभूळ चिंचा वाटून घेऊ
रंग चित्रे जपून ठेऊ

शाळेतल्या त्या वहीत माझ्या, तुझ्या-मैत्रीचा लेख
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक


गप्पांच्या रात्री , चांदण्यांची छत्री
घट्ट करती आपली हि मैत्री 

सुरात मिसळले हे सूर, कधी भांडणं अनेक 
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक


सरले माहेर, उरले सासर
हाक मारती गाईला वासरं

माझ्या जुन्या गोष्टीत फक्त तुझाच उल्लेख
माहेरच्या तुझ्या माझ्या आठवणी एक                      

भावना

Monday, 26 January 2015

नॉन-स्टिक तवा


आज खरेदी करायचा मूड होता. खूप दिवस बाजूला पडलेली खरेदी, म्हणजे तसं विशेष काही नाही. एक नॉन-स्टिक तवा घ्यायचा होता. जुन्या तव्याचा वर्ख कधीच निघून गेला होता. त्याच्यावर टाकलेला प्रत्येक डोसा व्यवस्थित तेल पीत होता आणि तरीही फार हट्टानी तव्यावरून सोडवावा लागत होता.

हल्ली एखादी छोटीशी गोष्ट जरी विकत घ्यायची असली तरी मॉल ला पर्याय नाही. मी माझ्या नेहेमीच्या सवई प्रमाणे मॉल मध्ये शिरताना एक मोठ्ठी ट्रोंली घेतली. खर्च वाचवताना नसला तरीही खर्च करताना मी भविष्याचा विचार नेहेमीच करते. त्यामुळे आलोच आहोत तर अशीच एखाद-दुसरी खरेदी होऊ शकेल म्हणून मी ट्रोंली घेऊन ठेवलेली.

माझी आणखी एक चांगली सवय म्हणजे मी कुठचीही वस्तू विकत घेण्या आधी त्याच्या वर लिहिलेल्या सूचना, कुठे बनली आहे, कशी बनवली आहे इत्यादी गोष्टी कितीही अगम्य असल्या तरीही मनापासून बघते. आज अशीच, मी माझा भावी नॉन- स्टिक तवा निवडण्यात, व्यग्र होते आणि माझ्या लक्षात आलं माझी ट्रोंली गायब झालेली. रिकामी का असेना पण मी ती स्वकष्टांनी इथपर्यंत आणलेली!

स्वतःचं खूप काहीतरी गमावल्या सारखी कावरीबावरी होऊन मी आजूबाजूला बघितलं. माझ्या बाजूलाच एक सहा फुटापेक्षा उंच आणि मी कितीही प्रयत्न केला तरीही मेक- अप करू शकणार नाही इतका गोरा इंग्रज नॉन-स्टिक कढई घेण्यात मग्न होता. त्याचं प्लान्निंग माझ्या इतकं परफेक्ट नसल्यामुळे त्यानी एक लहान बास्केट आणलेली. आणि, आत्तापर्यंत केलेली खरेदी त्याच्या खिशाला आणि त्याच्या हातांना परवडणारी असेलही, तरीही त्या छोट्या बास्केट ला पेलवत नव्हती, त्यामुळे त्यानी बाजूची रिकामीच असलेली माझी ट्रोंली सोयीस्करपणे आपल्या ताब्यात घेतलेली. पाहताक्षणी खरंतर त्या इंग्रजाच्या व्यक्तिमत्वामुळे मी दबून गेलेहोते. पण माझी ट्रोंली घेतल्यामुळे किव्वा कदाचित आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे माझा स्वाभिमान आणि देशाभिमान अचानक जागे झाले.  मी आत्तापर्यंत लिहिलेलं, वाचलेलं सगळं इंग्लिश पणाला लाऊन आणि शाळेतल्या बापट बाईंना स्मरून त्याला म्हटलं, " एक्स्क्युज मी!...माय ट्रोंली!". त्यांनी माझ्याकडे बघून हसून सॉरि म्हटलं आणि माझ्या ट्रोंलीतून आपली बास्केट काढून घेतली.

मनात आलं किती सोप्पं झालं असतं ना सगळं, अशीच तेंव्हा जर यांनी आपली गोष्ट  दीडशे वर्ष न लावला परत केली असती!  असो….आता त्याच्या हातात त्याची नॉन- स्टिक कढई होती आणि मलाही तोपर्यंत माझा नॉन- स्टिक तवा सापडला होता आणि आम्ही दोघं एकमेकाकडे बघून छान हसलोही होतो.

पण खरंच अशी कुठचीही गोष्ट करपेपर्यन्त मनाला चिकटू नं देणारा नॉन-स्टिक तवा सापडेल का?!!
 
…भावना

 

"मी"


कितीही वेगळे असलो तरी, माणसच आहोत ना आपण !
मग का विसरता येत नाही आपल्याला, आपलंचमी’पण?
 
आपसूक हसू उमटवते, एखादी छोटीशी गोष्ट
का असतो 'मी', तरीही एवढा शिष्ट ?


रंग रंगाहून वेगळा, बनते रंगसंगती
मग 'मी' का उभा करतो, त्यामध्ये भिंती?
 
फक्त एक माध्यम आहे पैसा, व्यवहार व्हावा सुरळीत
पण वैर निर्माण करतो, नसेल जेवढं भोपळा आणि विळीत   
 
"I " इंग्रजीत आहे कॅपिटल, मराठीत आहे  दीर्घ "मी"
ह्रस्व असणं मान्य करेल, तेंव्हाच  ठरेल मोठा नेहेमी!!

…भावना

Sunday, 25 January 2015

Perfection


Beauty



Simplicity


Concentration



Passion


मश्गुल


Loyalty


हतबल


Think Big



एक ओला दिवस


सोबत


एकांत


वाट कष्टाची


Saturday, 24 January 2015

Oh God!!!.....


Bless us with wisdom……. bless us with brilliance

Bless us with life……………bless us with credence.

Oh God ! bless us with passion forever ..…..for truth, beauteous in all sense.

 

Drive to the right path……………those who are going astray

Accompany those, who have lost their protection and way.

For the devotion to you………….keep presence.

Oh God ! bless us with passion forever ..…..for truth, beauteous in all sense.

 

Let our hearts ………be alive to feel and be conscious

towards the grief of downtrodden, frail or lugubrious.

Strengthen our words, give meaning to the life, to pierce the evil fill power in our veins

Oh God ! bless us with passion forever ..… …..for truth, beauteous in all sense.

 

Correct path, valid thoughts …..give us right society.

Don’t allow turbid ethics in any disaster or calamity.

To ascend, give new sinewy wings and open new heavens

 Oh God ! bless us with passion forever ………for truth, beauteous in all sense.

 ………BHAVANA

(एका मराठी प्रार्थनेचे रुपांतर)
 

ये ना तू आत्ता!!!!


किती छान दिवस आहेत...

तुझे कपडे नसतात धुवायला!

 

किती छान दिवस आहेत...

काहीही चालतं जेवायला!!

 

किती छान दिवस आहेत...

संध्याकाळी डोअर बेल त्रास देत नाही!

 

किती छान दिवस आहेत...

रात्री कोणीही घोरत नाही!!

 

किती छान दिवस आहेत...

वेळ मिळाला लिहायला कविता!

 

किती छान दिवस आहेत...

हि वाचायला ये ना तू आत्ता!!!!

…भावना

भिजुनी चिम्ब


ती रात्र सरली अलगद, तरी धुंदी हवेत होती I

बावरली पहाट अजुनी, स्वप्नांच्या कवेत होती II

 

ते तरंग ते रोमांच, कितीदा नव्याने आले I

आतुर त्या क्षणाची, हलकेच वाढवून गेले II

 

हि सरगम ओळख सांगे, रुजली म्हणून मनात I

असणे असण्यास विसरले, स्पर्शाच्या सहवासात II

 

त्या क्षणिक क्षणाचे असणे, हि कस्तुरीच आहे I

भिजुनी चिम्ब झाले, दडवला तर थेंब आहे!!!

 

भावना