Sunday, 21 February 2016

बंड सक्ख्या अवयवांचा...


"माझ्यामुळेच बघु शकताय तुम्ही", डोळे म्हणाले
लगेच नाकाचा शेंडा झाला लाल
टवकारलेले कान झाले भलतेच गरम
नुसतेच फुगत चाललेले गाल



मानेची एकाच्याही विधानाला समती नव्हती
खांदे उडवुन लावत होते सगळ
हातानी झटकुन टाकलेली आपलीच युती
त्यान्ना डाव-उजव हि हव होत वेगळ



पोट फक्त आपल्या विचारात मग्न
पायांपुढे जाउ शकत नव्हत कोणी
तोंडाचा पट्टा सतत चालु
डोक करत होत बंडाची पहाणी



सारख्याच प्रेमाने त्यान्ना सांभाळणारी त्वचा
पण आज तिलाही नको होता स्पर्श
मन हळव झाल...आता पुढे काय..कस म्हणत
काय उपयोग नुसता घेउन परामर्श!!!

...भावना


लहरी गुरुत्वाकर्षण…


गुरुत्वाकर्षणाच्या लहरीन्ना
आली आज अचानक लहर
बाबा भिडले छताला,
घरभर ऑफिसच्या फायलींचा कहर



खूश दिसत होता दादा
आज सहज डंबेल उचलताना
उलट्या लटकणार्या त्याच्या
खिशातली सिगरेट मी पाहिली पडताना



ताईच्या मेकपचा डब्बा उपडा
ताई झालेली रागानी लाल
हीच का शेड हवी होती हिला ?
रंगवायला हिचे गोरे गाल



आजोबा शोधत होते चष्मा, काठी
फिरत होती हसत आजीची कवळी
कपडे सगळे घड्या मोडुन मजेत
कोण पारोसे कोणती सोवळी



गम्मत हि बघत मी गादिवर लोळत
कॉट मस्त तरंगत होती हवेत
इतक्या सगळ्या गोंधळात मात्र
आईचे पाय जमिनीवरच घट्ट का रहावेत!!


....भावना

Silent candle…


The way is dark
but the candle is their
why is he arguing
on its light not fair?



"The flame is so small", he said
"not enough to see "
the candle is still burning
keeping aside its 'ME'



"difficult to hold "
his endless complaint
now it is its turn to yell
no doubt, it is not saint



"why is its shadow  unsteady "
his adding goes on, he is thinking he is clever
please help him to realise
burn to none is its destiny, but he will lose the one for now and forever





….Bhavana

डायरी त ली शायरी ......9


*…….उम्र नाराज हुइ हमसे
       जब हम गिनती उसे सिखाने निकले
       '
रुक यही और खेल मेरे साथ'... बोली
       '
वो जो निकले वो गम खोजने सयाने निकले '



*……मतलब से मतलब रखनेकि लत तग गयी है जिन्हे
       तेरे हाथो पर रुकी तितली लुभाएगी उन्हे
       तेरे ऑसू तेरे अकेलेपन और उनकी नासमझी पर जो बहे
       मत भूल यहा कोइ अकेला नही
       उनके साथ नासमझी सही पर तेरे साथ सदा तितली रहे


...
भावना

डायरी त ली शायरी ......8


*……..शिकवा था तुजसे जब... किसी भी मोडपे कोइभी मिला
        दुसरोन्ने नक्षेकदम ढुंडे...अब तेरे दरपे वक्त से पहेले लाउ मै गिला



*……..बारिश मे बाहर निकला, ठंड मे ओढी चादर, गर्मी मे पसिने पोछे
        खामी खोजनेवालोंके लिये तुने भी कितने तरिके सोचे



*…….जहा जाउ मै पाउ तेरे होने के निशान
       फिरभी क्यो ढुंडता फिरता दरदर मै होकर परेशान
...भावना

Tuesday, 2 February 2016

एक मणी मिळेना


पसरलेल्या मण्यांचे

गणित काही जुळेना

आठवणींच्या माळेमधला

एक मणी मिळेना



खूप थकले

शोधुन दमले

अस्वस्थ मन

कोणा कळेना

आठवणींच्या माळेमधला

एक मणी मिळेना



गोल होता?

लाल होता?

पण तो तेव्हा 

अनमोल होता

रूप-रंग

स्मरण्यात मी दंग

काळजीहि आता छळेना

आठवणींच्या माळेमधला

एक मणी मिळेना



दिवस सरले

रात्री सरल्या

कित्येक नव्या

गोष्टी विरल्या

स्मरणे विसरणे

होत गेले

माळेत मणी

ओवत गेले

खुपण रुपण राहुन गेल

सवेदना सौम्य झाली वेळेत

रिकाम्या उरल्या जागांचीहि

नक्षी झाली माळेत

आठवणींच्या माळेमधला

तो मणी जरी मिळेना...

तरि सुटुन गेल्या त्या क्षणांचे

रुणानुबंध टळेना

आठवणींच्या माळेमधला

एक मणी मिळेना



भावना