पसरलेल्या
मण्यांचे
गणित
काही जुळेना
आठवणींच्या
माळेमधला
एक मणी मिळेना
खूप
थकले
शोधुन
दमले
अस्वस्थ
मन
कोणा
कळेना
आठवणींच्या
माळेमधला
एक मणी मिळेना
गोल
होता?
लाल
होता?
पण तो तेव्हा
अनमोल
होता
रूप-रंग
स्मरण्यात
मी दंग
काळजीहि
आता छळेना
आठवणींच्या
माळेमधला
एक मणी मिळेना
दिवस
सरले
रात्री
सरल्या
कित्येक
नव्या
गोष्टी
विरल्या
स्मरणे
विसरणे
होत
गेले
माळेत
मणी
ओवत
गेले
खुपण
रुपण राहुन गेल
सवेदना
सौम्य झाली वेळेत
रिकाम्या
उरल्या जागांचीहि
नक्षी
झाली माळेत
आठवणींच्या
माळेमधला
तो मणी जरी मिळेना...
तरि
सुटुन गेल्या त्या क्षणांचे
रुणानुबंध
टळेना
आठवणींच्या
माळेमधला
एक मणी मिळेना
…भावना