"माझ्यामुळेच बघु शकताय तुम्ही", डोळे म्हणाले
लगेच नाकाचा शेंडा झाला लाल
टवकारलेले कान झाले भलतेच गरम
नुसतेच फुगत चाललेले गाल
लगेच नाकाचा शेंडा झाला लाल
टवकारलेले कान झाले भलतेच गरम
नुसतेच फुगत चाललेले गाल
मानेची एकाच्याही विधानाला समती नव्हती
खांदे उडवुन लावत होते सगळ
हातानी झटकुन टाकलेली आपलीच युती
त्यान्ना डाव-उजव हि हव होत वेगळ
खांदे उडवुन लावत होते सगळ
हातानी झटकुन टाकलेली आपलीच युती
त्यान्ना डाव-उजव हि हव होत वेगळ
पोट फक्त आपल्या विचारात मग्न
पायांपुढे जाउ शकत नव्हत कोणी
तोंडाचा पट्टा सतत चालु
डोक करत होत बंडाची पहाणी
पायांपुढे जाउ शकत नव्हत कोणी
तोंडाचा पट्टा सतत चालु
डोक करत होत बंडाची पहाणी
सारख्याच प्रेमाने त्यान्ना सांभाळणारी त्वचा
पण आज तिलाही नको होता स्पर्श
मन हळव झाल...आता पुढे काय..कस म्हणत
काय उपयोग नुसता घेउन परामर्श!!!
पण आज तिलाही नको होता स्पर्श
मन हळव झाल...आता पुढे काय..कस म्हणत
काय उपयोग नुसता घेउन परामर्श!!!
...भावना