गुरुत्वाकर्षणाच्या लहरीन्ना
आली आज अचानक लहर
बाबा भिडले छताला,
घरभर ऑफिसच्या फायलींचा कहर
आली आज अचानक लहर
बाबा भिडले छताला,
घरभर ऑफिसच्या फायलींचा कहर
खूश दिसत होता दादा
आज सहज डंबेल उचलताना
उलट्या लटकणार्या त्याच्या
खिशातली सिगरेट मी पाहिली पडताना
आज सहज डंबेल उचलताना
उलट्या लटकणार्या त्याच्या
खिशातली सिगरेट मी पाहिली पडताना
ताईच्या मेकपचा डब्बा उपडा
ताई झालेली रागानी लाल
हीच का शेड हवी होती हिला ?
रंगवायला हिचे गोरे गाल
ताई झालेली रागानी लाल
हीच का शेड हवी होती हिला ?
रंगवायला हिचे गोरे गाल
आजोबा शोधत होते चष्मा, काठी
फिरत होती हसत आजीची कवळी
कपडे सगळे घड्या मोडुन मजेत
कोण पारोसे कोणती सोवळी
फिरत होती हसत आजीची कवळी
कपडे सगळे घड्या मोडुन मजेत
कोण पारोसे कोणती सोवळी
गम्मत हि बघत मी गादिवर लोळत
कॉट मस्त तरंगत होती हवेत
इतक्या सगळ्या गोंधळात मात्र
आईचे पाय जमिनीवरच घट्ट का रहावेत!!
कॉट मस्त तरंगत होती हवेत
इतक्या सगळ्या गोंधळात मात्र
आईचे पाय जमिनीवरच घट्ट का रहावेत!!