स्वातंत्र्याची
आली सत्तरी
भिजत तरिहि
प्रश्न कितितरी
माझा देश स्वतंत्र
झाला
पण प्रजासत्ताक म्हणतात नक्की कशाला?
कोणी म्हणतो
"त्यांच चुकलं"
"त्यांनी
इतक्या वर्षात काय केलं?"
फ्लायओव्हरवर
उभं राहुन यांनी नारा दिला
म्हणजे प्रजासत्ताक
म्हणतात नक्की कशाला?
"फारच
वाढलाय गलिच्छपणा"
"आम्ही
का म्हणून, तुमची झाडू आणा"
स्वच्छतेवर उगाच एक पिंक टाकून दुसराहि गेला
प्रजासत्ताक
म्हणतात नक्की कशाला?
"आपली
अशी अस्मिताच नाहि उरली"
भाषणं दिली
त्यांनी भाली थोरली
मराठी प्रतिशब्द
आठवतना तिथेच त्यांचा जीव गेला
तरी प्रजासत्ताक
म्हणतात नक्की कशाला?
"भ्रष्टाचारानी
विणलय जाळं"
"खणून काढू पाळं-मुळं"
झाडाच्या सावलीत
उभ राहुन त्यांचा निर्णय झाला
हे प्रजासत्ताक
म्हणतात नक्की कशाला?
माझा देश स्वतंत्र
झाला
सत्तर वर्ष
होतील त्याला
त्याचा अभिमानच
आहे मला
तरिहि मला कळलं मात्र नाहि कि प्रजासत्ताक म्हणतात नक्की कशाला?
…भावना