या दर्याचं गाण गातोया पिसाट
वारा ..त्याला कुणीतरी आवरा
त्याला
होडिच्या शिडात बांधुन धरा....त्याला ....
नारळी
रांगेन आता वाकुन करतेया
सलाम
मोठ्या
जोशात बघायची ती लाम्ब लाम्ब
तिच्या
गर्वानी त्याच्या म्होर केला पोबारा...तरी
त्याला आता आवरा
त्याला
होडिच्या शिडात बांधुन धरा....त्याला ....
पार
उजाडल तरी उठाया धजना
कुणी
काल
रातीला याला भेटली का
साजणी
त्याच्या
मस्तीला हवाय जालीम उतारा....त्याला कुणीतरी आवरा
त्याला
होडिच्या शिडात बांधुन धरा....त्याला ...
पानं
सळसळती कानात काहिबाहि
याला
धरबंध कशाचा उरलाच नाही
द्यावा
दर्याच्या राजानी सबुत खरा..त्याला
कुणीतरी आवरा
त्याला
होडिच्या शिडात बांधुन धरा....
या दर्याचं गाण गातोया पिसाट
वारा ..त्याला कुणीतरी आवरा
…भावना