Friday, 22 January 2016

सोप्पे उपाय…


दात घासायचा उपाय म्हणजे नियमीत मीठ लावा

दुखतील दात घास चावण्याआधीच आणि लागेल जीव द्यावा



असंख्य टूथपेस्ट बाजारात त्या सगळ्याच डेंटिस्ट -प्रिय

म्हणजे ते  दिवसभर दाताच घासतात  काय? 



‘मिनिटभरही हात नका धुवु’ हा मुलांना असतो सल्ला

चांगले गुण नक्की कुठचे? हा त्यांच्या डोक्यात कल्ला



दुध नुसत आनंदानी पिण… हे कधीच का नसतं चांगल?

रंगीत पावडरी दुधात घाला…नाहितर मोठ होण थांबल!!



सगळ्याच सुंदर वाटणाऱ्या नट्यांचे प्रोब्लेमॅटिक असतात का केस?

काहितरी थापल्याखेरीज त्यांचा-त्यांनाही बघवत का नाही फेस!



बॉर्डरवर सैनिक आपले शत्रूशी मारतात का गप्पा?

आणि त्यांना अभिमानानी सांगतात आपल्या डिओच्या थापा?!



घरात नसेल रूम फ्रेशनर तर शेजारीण करते गॉसिप

सगळे आजार पळवून कसे लावतो रोज चहाचा एक सिप?



चोर पकड्ण्यासाठी जर फक्त चॉकलेट खायचं असतं

मग जगावेगळी कशी असते आमच्या आईची शिस्त??



उन्हामध्ये ट्रॅफिक पोलिस ना फक्त द्यावी एक गोळी

 ट्रॅफिकजॅम चे प्रोब्लेम नसतील मग असे वेळोवेळी



रोज दर पाच मिनिटांनी सांगतात जर सोप्पे उपाय

न्युज चॅनलवर प्रॉब्लेमची ओरड... का नाही पहात ते हे पर्याय??

भावना