नव्वदितही
नऊवारीचा भार ती सांभाळे
विटकी
वस्त्रे हिची, वरती चित्र-विचित्र
ठिगळे
भाषा
तिची, माती मधला गंध
घेऊन येते
हिच्या
चार शब्दात दरी, सरस्वती पश्चिमाभिमुख
होते
भल्या
पहाटे उठे कोंबडा, तिची
भुपाळी आधिच दळणे
हिच्या
उशाशी घड्याळ घोरत, आळस देती रवीकिरणे
मोजण्यास
जरी दोन अंक... हिस
शस्त्र, अस्त्र, हत्त्यारे
तिची
सावली घड्याळ होते, ऋतू-चाहुल देती
वारे
तीन
पिढ्यातील प्रचंड अंतर, तरी सरळच यांची
वळणे
ते सुरकुतलेले हात शिरी, हे
आपसुक वंदती चरणे
…भावना