आयुष्याच्या
कॅनव्हासवर उत्साहाचा रंग हवा
परिश्रमाचा रंग पाणी न
घालता वाढवा
प्रयत्नांचा
कुंचाला देईल आनंद निर्मितीचा
हे चित्रच आधार होईल घराच्या
भिंतीचा
चित्रात
जरी... तुडवलेल्या अपेक्षांची खुरटलेली असेल वाढ
त्यांना
उमेदीचे धुमारे फुटलेले असतील… म्हणत असतील 'यातून मार्ग काढ'
दृष्टीपथात
जरी तिथे दुखाचे डोंगर
असतील
अगदी
जवळ फुलझाडांवर आशेच्या कळ्या ही दिसतील
एकच
का होइना... उबदार घर असेल वाट
बघत उघडून दार
त्याला
कुंपण नसेल काटेरी प्रश्नांच...फक्त एक वेल
फुलली असेल झाडाचा घेऊन
आधार
संयमानी वहाणारी एक नदी असेल तिथे
पाऊलवाटेला
दोनच पाय पुरतील नको असंख्य जथे
तीन पक्षांच
स्वतःचं असं असेल तिथे आकाश
डोंगरा मागून सूर्य येतोय घेऊन सुखाचा प्रकाश
काळ्या ढगात
जरी असेल भविष्यातला पाऊस लपला
विहिरीवरच्या
रहाटानी सोडला नसेल दिनक्रम आपला
प्रामाणिक कुत्र्याशेजारी
असेल कोंबडी आणि तिची निरागस पिलं
या चित्रानीच
आपल्याही असण्याला एक सुंदर कारण दिलं
…भावना