Monday, 16 May 2016

आणि त्यान्ना वाटल...त्यान्नी प्रेम केल!!

वयानुरुप थोडी नजरानजर
थोडी स्पर्शाची देवाण-घेवाण
इत्यादी झाल
आणि त्यान्ना वाटल...त्यान्नी प्रेम केल!!!

हे वयात हरवलेले
बरेच लोक टपलेले
त्यान्नी येता-जाता निरिक्षण केल
आणि त्यान्नाहि वाटल...यान्नी प्रेम केल!!!

अजाण फक्त आई-वडिल
त्यान्ना समजवायची संधी कोण सोडिल?
बर्याच गुंतागुंतीतुन त्यांचहि मत पक्क झाल
आता त्यान्नाहि पटल...यान्नी प्रेम केल!!!

तातडिनी लग्न
सर करुन अनेक विघ्न
बोटात, गळ्यात निशाण आल
त्यामुळे बहुतेकान्ना पटल... यान्नी प्रेम केल!!

पुढची वर्ष, भांडणात गेली
एक दिवशी काडि मोडायला आली
पण सगळ खापर बिचार्या प्रेमावर फुटल
कारण सगळ्यान्नाच वाटल होत...यान्नी प्रेम केल!!!
...
भावना