Monday, 16 May 2016

मैत्रीचा हात

मैत्री साठी पुढे केलेल्या हातावर
चर् कन चटका बसावा
असा मन उदास करणारा अनुभव
कधीच कुणाच्या नशीबी नसावा

त्या चटक्याचे तसेच रहातात मग व्रण
आपण कुढत रहातो
आणि बाजुला असतो फक्त तोच त्रासदायक क्षण

बरा होत नाही
आणि तोडुनहि टाकता येत नाही आपला हात
कारण त्याच हाताला परत पुढे होउन
जायच असत खर्या मैत्रीच्या शोधात

...भावना