Monday, 16 May 2016

निवड

माझ द्विधा मन
विचारात मग्न 
दोन दिशान्ना वाटा 
जरी कोन सलग्न

निवड लागलीच करावी 
जरि माहित नव्हत हीच का हवी 
एका वाटेवर कित्येक पाउल
एक वाट तशीच नवी

एकिकडे नक्किच ओढा 
सूर्य तिथेच रहातो म्हणे 
एका वाटेचे मुक्याने 
गुढ, अव्यक्त चालणे

पहिलीकडे पाहुन मी 
दुसरिच चालु लागले
जरी पहिलीकडेच वळले 
माझ्या पुढले, माझ्या मागले

आले मी इथे हिच्या सोबत, 
तरि ते तिची किव म्हणुन नाही 
सोप नव्हत म्हणण जी सोडली 
तिच्यावर माझा जीव नाही

'परत कधी तरि', 
अशी वेळ येत नसते 
एक वाट एकदा धरली कि 
ती दाखवेल तेच दिसते

आता या वाटेला मी म्हटल आपल, 
म्हणुन नाही 
पण हिच माझा मार्ग ठरेल 
आता तिचा विश्वास लाभो मलाहि
....भावना