Monday, 16 May 2016

विकतच दु:ख

ओळख माझी पुसायला आडनाव घेतलत विकत 
इथवर मी आले अशीच 'हतबल होण' शिकत

सोसण, रेटण, स्विकारत जाण हे मिळाले दागिने 
काय गुन्हा केला म्हणायचा मग त्या आगीने

जळुन गेला देह ज्याला सरणाचीही किम्मत नव्हती 
उरली बनुन राख फक्त जगण्याची इच्छा भोवती

त्या इच्छेला आशेचा तुम्ही एक किरण दाखवा 
स्वत:च्याच हाताने गिरवुन तिला 'हतबल होण' शिकवा
...भावना