Wednesday, 27 January 2016

प्रजासत्ताक


स्वातंत्र्याची आली सत्तरी

भिजत तरिहि प्रश्न कितितरी

माझा देश स्वतंत्र झाला

पण  प्रजासत्ताक म्हणतात नक्की कशाला?



कोणी म्हणतो "त्यांच चुकलं"

"त्यांनी इतक्या वर्षात काय केलं?"

फ्लायओव्हरवर उभं राहुन यांनी नारा दिला

म्हणजे प्रजासत्ताक म्हणतात नक्की कशाला?



"फारच वाढलाय गलिच्छपणा"

"आम्ही का म्हणून, तुमची झाडू आणा"

स्वच्छतेवर  उगाच एक पिंक टाकून दुसराहि गेला

प्रजासत्ताक म्हणतात नक्की कशाला?



"आपली अशी अस्मिताच नाहि उरली"

भाषणं दिली त्यांनी भाली थोरली 

मराठी प्रतिशब्द आठवतना तिथेच त्यांचा जीव गेला

तरी प्रजासत्ताक म्हणतात नक्की कशाला? 



"भ्रष्टाचारानी विणलय जाळं"

"खणून काढू  पाळं-मुळं"

झाडाच्या सावलीत उभ राहुन त्यांचा निर्णय झाला

हे प्रजासत्ताक म्हणतात नक्की कशाला?



माझा देश स्वतंत्र झाला

सत्तर वर्ष होतील त्याला

त्याचा अभिमानच आहे मला

तरिहि मला  कळलं मात्र नाहि कि प्रजासत्ताक म्हणतात नक्की कशाला?



भावना

Monday, 25 January 2016

हे तो काय करतोय!?!


डिव्होर्स पेपर्स आहेत साइंड

मेमो करतोय तेच तेच रिमाइंड

सगळ्यांच्याच अपेक्षा अपूर्ण ठेवतोय

आणखी वर कहर म्हणजे ...मलाच भेटायला मी झुरतोय



माझं  माझ्यावर प्रेम आहे

म्हणुनच कोलेस्टेरॉल कमी करण हे एम आहे

पण ट्रेडमिलही आता बसुन बसुन वजन वाढवतोय

कारण, काय करणार मी असतो कुठे! ...मलाच भेटायला मी झुरतोय



घरात न्युज पेपर्सची असते चळत

एकहि वाचायला वेळ मात्र नाहि मिळत

रद्दीवालाहि ' गिर्हाइक कमी' ..हा GK चा फुल फॉर्म आहे हे सांगतोय

पण मला कसा माहित असणार? कारण ...मलाच भेटायला मी झुरतोय



लेटेस्ट गॅझेट्स आहेत सगळी

चार्ज करायला आता माणसं हवीत वेगळी

नावीन्याच्या मोहात नुसताच गुरफटत जातोय

करावं लागतं! तरिहि कधी कधी जाणवतं ...मलाच भेटायला मी झुरतोय



एकदा वाटतं  द्यावं फेकुन

या ओझ्यानी गेलोय पुरता वाकुन

पण अशावेळी लक्षात येतं

...हसत समोर यायला एक कप चहा वाट बघतोय

...कदाचित इंक्रीमेंट लिस्टमधे आपल्या नावाचा विचार होतोय

...सायकल चालवावी हा पर्याय सोप्पा दिसतोय

...घरात कोणी न्युज पेपरच्या छान वस्तु बनवतोय

...गॅझेट्स हाताळायची कशी याचं GK ..म्हणजे गुप्त कसब , KG तच कुणी वापरतोय

 मग गुरफटायला हवच की यात कारण... मी हे बरोबर करतोय!!



हे तो काय करतोय!?!



डिव्होर्स पेपर्स आहेत साइंड

मेमो करतोय तेच तेच रिमाइंड

सगळ्यांच्याच अपेक्षा अपूर्ण ठेवतोय

आणखी वर कहर म्हणजे ...मलाच भेटायला मी झुरतोय



माझं  माझ्यावर प्रेम आहे

म्हणुनच कोलेस्टेरॉल कमी करण हे एम आहे

पण ट्रेडमिलही आता बसुन बसुन वजन वाढवतोय

कारण, काय करणार मी असतो कुठे! ...मलाच भेटायला मी झुरतोय



घरात न्युज पेपर्सची असते चळत

एकहि वाचायला वेळ मात्र नाहि मिळत

रद्दीवालाहि ' गिर्हाइक कमी' ..हा GK चा फुल फॉर्म आहे हे सांगतोय

पण मला कसा माहित असणार कारण ...मलाच भेटायला मी झुरतोय



लेटेस्ट गॅझेट्स आहेत सगळी

चार्ज करायला आता माणसं हवीत वेगळी

नावीन्याच्या मोहात नुसताच गुरफटत जातोय

करावं लागतं! तरिहि कधी कधी जाणवतं ...मलाच भेटायला मी झुरतोय



एकदा वाटतं  द्यावं फेकुन

या ओझ्यानी गेलोय पुरता वाकुन

पण अशावेळी लक्षात येतं

...हसत समोर यायला एक कप चहा वाट बघतोय

...कदाचित इंक्रीमेंट लिस्टमधे आपल्या नावाचा विचार होतोय

...सायकल चालवावी हा पर्याय सोप्पा दिसतोय

...घरात कोणी न्युज पेपरच्या छान वस्तु बनवतोय

...'गॅझेट्स हाताळायची कशी?' याचं GK ..म्हणजे गुप्त कसब , KGतच कुणी वापरतोय

 मग गुरफटायला हवंच की यात कारण... मी हे बरोबर करतोय!!



भावना

Friday, 22 January 2016

सोप्पे उपाय…


दात घासायचा उपाय म्हणजे नियमीत मीठ लावा

दुखतील दात घास चावण्याआधीच आणि लागेल जीव द्यावा



असंख्य टूथपेस्ट बाजारात त्या सगळ्याच डेंटिस्ट -प्रिय

म्हणजे ते  दिवसभर दाताच घासतात  काय? 



‘मिनिटभरही हात नका धुवु’ हा मुलांना असतो सल्ला

चांगले गुण नक्की कुठचे? हा त्यांच्या डोक्यात कल्ला



दुध नुसत आनंदानी पिण… हे कधीच का नसतं चांगल?

रंगीत पावडरी दुधात घाला…नाहितर मोठ होण थांबल!!



सगळ्याच सुंदर वाटणाऱ्या नट्यांचे प्रोब्लेमॅटिक असतात का केस?

काहितरी थापल्याखेरीज त्यांचा-त्यांनाही बघवत का नाही फेस!



बॉर्डरवर सैनिक आपले शत्रूशी मारतात का गप्पा?

आणि त्यांना अभिमानानी सांगतात आपल्या डिओच्या थापा?!



घरात नसेल रूम फ्रेशनर तर शेजारीण करते गॉसिप

सगळे आजार पळवून कसे लावतो रोज चहाचा एक सिप?



चोर पकड्ण्यासाठी जर फक्त चॉकलेट खायचं असतं

मग जगावेगळी कशी असते आमच्या आईची शिस्त??



उन्हामध्ये ट्रॅफिक पोलिस ना फक्त द्यावी एक गोळी

 ट्रॅफिकजॅम चे प्रोब्लेम नसतील मग असे वेळोवेळी



रोज दर पाच मिनिटांनी सांगतात जर सोप्पे उपाय

न्युज चॅनलवर प्रॉब्लेमची ओरड... का नाही पहात ते हे पर्याय??

भावना

Wednesday, 20 January 2016

असण्याचं कारण…


आयुष्याच्या कॅनव्हासवर उत्साहाचा रंग हवा

परिश्रमाचा रंग पाणी घालता वाढवा



प्रयत्नांचा कुंचाला देईल आनंद निर्मितीचा

हे चित्रच आधार होईल घराच्या भिंतीचा



चित्रात जरी... तुडवलेल्या अपेक्षांची खुरटलेली असेल वाढ

त्यांना उमेदीचे धुमारे फुटलेले असतील… म्हणत असतील 'यातून मार्ग काढ'



दृष्टीपथात जरी तिथे दुखाचे डोंगर असतील

अगदी जवळ फुलझाडांवर आशेच्या कळ्या ही दिसतील



एकच का होइना... उबदार घर असेल वाट बघत उघडून दार

त्याला कुंपण नसेल काटेरी प्रश्नांच...फक्त एक वेल फुलली असेल झाडाचा घेऊन आधार



संयमानी  वहाणारी एक नदी असेल तिथे

पाऊलवाटेला दोनच पाय पुरतील नको असंख्य जथे



तीन पक्षांच स्वतःचं असं असेल तिथे आकाश

डोंगरा मागून सूर्य येतोय घेऊन सुखाचा प्रकाश



काळ्या ढगात जरी असेल भविष्यातला पाऊस लपला

विहिरीवरच्या रहाटानी सोडला नसेल दिनक्रम आपला



प्रामाणिक कुत्र्याशेजारी असेल कोंबडी आणि तिची निरागस पिलं

या चित्रानीच आपल्याही असण्याला एक सुंदर कारण दिलं

भावना

Saturday, 16 January 2016

त्याला कुणीतरी आवरा...


या दर्याचं गाण गातोया पिसाट वारा ..त्याला कुणीतरी आवरा

त्याला होडिच्या शिडात बांधुन धरा....त्याला ....



नारळी रांगेन आता वाकुन करतेया सलाम

मोठ्या जोशात बघायची ती लाम्ब लाम्ब

तिच्या गर्वानी त्याच्या म्होर केला पोबारा...तरी त्याला आता आवरा

त्याला होडिच्या शिडात बांधुन धरा....त्याला ....



पार उजाडल तरी उठाया धजना कुणी

काल रातीला याला भेटली का साजणी

त्याच्या मस्तीला हवाय जालीम उतारा....त्याला कुणीतरी आवरा

त्याला होडिच्या शिडात बांधुन धरा....त्याला ...



पानं सळसळती कानात काहिबाहि

याला धरबंध कशाचा उरलाच नाही

द्यावा दर्याच्या राजानी सबुत खरा..त्याला कुणीतरी आवरा

त्याला होडिच्या शिडात बांधुन धरा....

या दर्याचं गाण गातोया पिसाट वारा ..त्याला कुणीतरी आवरा

भावना

Friday, 15 January 2016

माझी आजी आणि लेक


नव्वदितही नऊवारीचा भार ती सांभाळे    

विटकी वस्त्रे हिची, वरती चित्र-विचित्र ठिगळे



भाषा तिची, माती मधला गंध घेऊन येते

हिच्या चार शब्दात दरी, सरस्वती पश्चिमाभिमुख होते



भल्या पहाटे उठे कोंबडा, तिची भुपाळी आधिच दळणे

हिच्या उशाशी घड्याळ घोरत, आळस देती रवीकिरणे



मोजण्यास जरी दोन अंक... हिस शस्त्र, अस्त्र, हत्त्यारे

तिची सावली घड्याळ होते, ऋतू-चाहुल देती वारे



तीन पिढ्यातील प्रचंड अंतर, तरी सरळच यांची वळणे

ते सुरकुतलेले हात शिरी, हे आपसुक वंदती चरणे

भावना