अथांग समुद्र आहे
अस्वस्थ पाणी आहे
होडीत फक्त बसणं
हीच स्वीकारलेली रहाणी आहे...
सूर्य येतो पूर्वेकडून
रोज पश्चिमेला जातो
डाव्या उजव्या कोपऱ्यातून
आम्ही बघत रहातो
त्याच्या येण्या- जाण्याने
पुढे सरकणारी कहाणी आहे
होडीत फक्त बसणं
हीच स्वीकारलेली रहाणी आहे...
सेकंदा- सेकंदाला वाजतोय
घड्याळाचा एकेक टोला
आम्ही फक्त हो म्हणतोय
त्याच्या हो ला
मान हालवायचीहि जबाबदारी नको
पांढरा रंग हीच निशाणी आहे
होडीत फक्त बसणं
हीच स्वीकारलेली रहाणी आहे...
वल्ह कोरडेच, खंत नाही
आम्हाला नाहीतच हात
वारा नेइल त्या दिशेला
होडी जाईल वहात
सुख चालत येत नाही
हीच दु:खी पायांची विराणी आहे
होडीत फक्त बसणं
हीच स्वीकारलेली रहाणी आहे...
... भावना
अस्वस्थ पाणी आहे
होडीत फक्त बसणं
हीच स्वीकारलेली रहाणी आहे...
सूर्य येतो पूर्वेकडून
रोज पश्चिमेला जातो
डाव्या उजव्या कोपऱ्यातून
आम्ही बघत रहातो
त्याच्या येण्या- जाण्याने
पुढे सरकणारी कहाणी आहे
होडीत फक्त बसणं
हीच स्वीकारलेली रहाणी आहे...
सेकंदा- सेकंदाला वाजतोय
घड्याळाचा एकेक टोला
आम्ही फक्त हो म्हणतोय
त्याच्या हो ला
मान हालवायचीहि जबाबदारी नको
पांढरा रंग हीच निशाणी आहे
होडीत फक्त बसणं
हीच स्वीकारलेली रहाणी आहे...
वल्ह कोरडेच, खंत नाही
आम्हाला नाहीतच हात
वारा नेइल त्या दिशेला
होडी जाईल वहात
सुख चालत येत नाही
हीच दु:खी पायांची विराणी आहे
होडीत फक्त बसणं
हीच स्वीकारलेली रहाणी आहे...
... भावना