Tuesday, 20 September 2016

Lets party… #Diwali skit

(  गाण ऐकायला जाइल असं  गुणगुणत स्टेजवर नवरा येतो ... टिशर्ट, / पॅण्ट... खुशीत, लक्ष हातातल्या कंदिलाकडे )

नवरा :-
"मै जिंदगी का साथ निभाता चला गया 
हर फिक्र को धुए मे उडा ....."

( पायाखाली लक्ष नसल्यामुळे रंगाच्या पिशवीला ( एक बंद, काहीतरी रंगीत भरलेली  पिशवी नुसती पाय लागला हे दाखवण्यापुरता वापरावी) लाथ लागते  ... )
( लगेच  खाली बसुन रांगोळी जरा नीट करत ...)
"अरे बापरे रांगोळी. अक्खा दिवस बसुन हिनी काढलेली. आता एका तासात परिक्षक येतील वर  घरहि सजवायच आहे हिला . आणि हे काय होउन बसल."

( नीट करतंच एका हातानी फोन लाउन कानाला लावून ..)
"गजा गजा ... अरे उचल..."( फोन लागला )

"कंदील कसला लटकवतो आहेस ... इथे मी अक्खा लटकलोय .... बर ते जाउ दे रे  आधी रांगोळी स्पर्धेची थिम काय होती सांग जरा ... होती म्हणजे आहे "( अजुन रांगोळी तशी शाबुत आहे हे उभ राहुन बघत )

( परत बसुन आवरत) 
"The way I
लीव्ह? ... अरे लीव्ह नाही रे लिव्ह ... बर पुरे लीव्ह ... मी हरलो नाहि आहे तू लीव्ह आता ...जा आता  ..."

( "
अहो येताय ना?" नुसताच आवाज येतो
" लाग कामाला .... हाकारे ऐकू येताहेत बघ 
...
ओक्के ... फोटो ? .... पाठवतो ... बरोबर आहे सगळीकडे जायला कसं जमणार!...."

(
परत आवाज " अहोsss " ) 
"बाप रे हे आमच्या कडचे आहेत तर  ... "
( घाइत फोन बंद करतो )

"हर फिक्र को धुए मे उडा ...."
(
असं म्हणत रांगोळीचा फोटो काढुन ... मोबाइल बटण दाबत )"

"सेण्ड "...
(
आणि " आलो" म्हणत धावत पिशवी आणि कंदील घेउन  विंगेत जात )

(बायको दुसरी कडुन आत येत. दिवाळीची पूर्ण नटुन तयारी )...

बायको:-
(
मोठ्यानी बोलत ... हातात चादर किव्वा मोठा  टेबलक्लॉथ )
" किती वेळ लागणार आहे तुम्हाला अजुन हे ..." 
(
तितक्यात नवरा आत येत.. हातात कंदील आणि जर आधी रंगाची पिशवी वापरली असेल तर ती  ... पिशवी कोपर्यात सारत )

"...  हे बघ .... हा कंदील अगदी सांगितलेल्या शेड चा..मी आणि गजानी अक्खा दिवस शेड मधे  बसुन ..."
(बायको हातानी बोलण थांबवते आणि  उगाचच वैतागुन )
 
"
पूरे ....pj पुरेत त्यान्नी माझा उशीर केलात म्हणुन आलेला राग जाणार नाहि. "
"हि दोन टोक धरा आधी.. "

(
दोघ टेबलावर कापड अंथरत ) 
"
अहो असं नाहि ती किनार बरोब्बर या कडेवर."

( नवरा उगाच कापडाची किनार कडेवर आली का याचं निरिक्षण करत )
( बायको खिडकीकडे बघत खुश होउन) 
"
बघा ... मी सांगितल होत ना तुम्हाला"
(
त्याचं ही लक्ष मग घरातल्या नवीन वस्तून्कडे ) 
"
हा लेमन कलरचा पडदा या नवीन डार्क रेड भिंतीला शोभून दिसेल. आणि हे अभ्रे आणि हे नव सोफा कव्हरहि."

( बायको, उशीर होतोय हे लक्षात येउन चिडुन )
"
अहो बघत काय बसलात आत्त्ताच बघितल्या सारख काल आपणच आणलय ना हे."

( परत विसरुन घराच वर्णन करत )
"
तरि बघा ....हा यावेळचा रंगारी मागच्या वर्षी सारखाच निघाला  ... मी म्हटलेलं हि शेड थोडी आणखी डार्क हवी ..तर नाही  ... तरि बरं ही नवी ( पैठणी..... जी साडी नेसली असेल ती ) अगदी हव्या तश्श्या  रंगची मिळाली... मॅचिंग"

( परत लक्षात येउन ) 
"
अहो बघताय काय ... आधी वर चढा बघु ... कंदील लांबुनहि नीट दिसेल असा टांगा बरं ..."
( एखाद्या लहान स्टुलावर चढुन हातात कंदील ... खिडकीकडे वाकत )

"हो ... तू  स्टुल नीट धर ... तस तू असताना त्याची काय बिशाद म्हणा ...."
(
हसत विनोद करायचा प्रयत्न ...तेवढ्यात बायकोच्या बोलण्याने वाक्य अर्धवट राहुन ...रांगोळीच्या आठवणीने घाबरुन जाउन  )

"रांगोळीचा रिझल्ट लागायची  वेळ झाली ना हो..."
(
स्टुलाचा हात सोडुन समोरच आरसा असतो( प्रेक्षकत्यात टिकली आणि साडी न्याहाळताना )

"अय्या ......."( जोरात किंचाळते )

"काय झाल काय ... "( स्टुलावरुन उतरत .. कंदील तसाच बाजुला ठेउन )

"तुम्ही म्हणजे अतीच वेंधळे अहात. अजुन ती दिव्यांची माळ लाउन झाली नाही ग्रील ला..."

( खोक्यातली लांबलचक दिव्याची माळ दोघहि मिळेल ते टोक हातात घेउन सोडवण्याच्या प्रयत्नात आणि त्यात ती माळ नवऱ्याच्या गळ्यात आणि हाताभोवती गुंडाळली जाते. )

"गेल्यावर्षी पणतीच्या आकारात माळ लावा म्हटल तर अश्शी लावतीत" (हात ओवाळून ) "कोणालाही आकार ओळखु आला नाहि. शेजारचा बडु आपल्या बबडुला पाचहि दिवस चिडवत होता. ' पण ती कोण आहे'.....'पण ती कोणी बनवली.'......   ऱडत यायचा बिच्चारा सांगत." ( आठवून दु:खी होत )

इतक्यात फोन वाजतो...
(बायको फोन उचलुन  किंचाळत ) ... 
"
अय्या पहिला नंबर...पण येताच ....काय ह्यान्नी फोटो पाठवला.."( कौतुकानी बघत ) ...

"
हो ना फारच मदत... "(वाक्य अर्धवट) ...

"
हो का रांगोळीतला वेगाचा आणि धुक्याचा इफेक्ट आवडला  " ( चेहऱ्यावर काहिच कळल्याचे भाव ) 

"....
ओके पहिल्या तीनही रांगोळ्यान्चे फोटो पाठवले आहेत... बघते"

( फोन कडे बघत.... समजुन  ) 
"
अहो पण या माझ्या रांगोळीत धुकं आणि ..."
.( नवरा तशीच माळ लटकलेली...दोन्ही हात बाजुला करुन हसुन मान किंचीत वाकवुन अभिवादन स्वीकारत ) 

"
इश्श ... "( आनंदानें हसत कौतुकाने  ) "चढा आता वर.."

 "या दिवाळीला तुम्हाला हवी तर चांदणी करा त्या माळेची.... "(नवऱ्याने वर चढुन चांदणी बनवायची म्हणुन बायकोकडे चमकुन बघितल्यावर ) ( थोडस लाजुन हसत ) 
"
नाहीतर नुसतीच लावा तोरणासारखी ... तशीहि छानच दिसते कि.... "

( नवरा खूश होउन गुणगुणत गळ्यातल्या माळेच एक टोक ग्रीलला अडकवायच्या प्रयत्नात ....बायकोला टेबल पकडायची खुण करत ... ती पकडते ) 

"बरबादियोंका जश्न मनाता चला गया ... हर फिक्र को धुए मे उडा ..... " ( पडदा पडतो )

.... भावना