Tuesday, 20 September 2016

वेग-वेगळे बाप्पा

एकत्रच आहोत आपण 
कुठेही असलो जरी सगळे 
दोन भाऊच पण गर्दी नको म्हणत 
ते झाले वेगळे

कौतुक करा आता सगळे 
गणपती घरी आले
भावाभावात प्रेम 
बाप्पा एका घरी विराजमान झाले

कौतुक करुन घ्यायला 
घातले मोठ मोठ्ठे घाट 
पाहुणे शंभर बोलावले 
भावाला मग पुरेनात पाट

ओसरली नवलाई 
यजमानीण बाईंचं डोकं चढलं 
मागल्या वर्षी शेवटी 
बाप्पान्ना भावाकडे धाडलं

तिथे त्यांचं नीट चाललं 
आपणंच का घ्यावी माघार 
यावर्षी परत 
आम्हालाच द्या साभार

एक सोडून दोन घरं 
बाप्पा होते खुशीत
पण चढाओढीची माशी शिरली 
मोदकांच्या बशीत

तुमची पद्धत, आमची आरास 
विघ्नच झाली फार 
आटली मोदकांवरची 
तूपाची धार

गप्पांच्या ओघामध्ये 
मार्ग सुचला सोप्पा 
पुढल्या वर्षी आता 
वेगळे होतील बाप्पा


... भावना